पान:जपानचा इतिहास.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वे

९५


ज्याने परराष्ट्रांशी तहनामे केले होते तो शोगुन मेला. त्याचा मुलगा केवळ बारा वर्षीचा असल्यामुळे त्याच्या नांवानें त्याचा कारभारी राज्यकारभार पाहूं लागला. परंतु पुढे त्या दिवा- णाचाही लवकरच खून झाला. नंतर पुन्हां दुसरा दिवाण कारभार पाहूं लागला. ह्या नवीन दिवाणानें प्रत्येक दायमि- योनें वर्षातून सहा महिने येड्डो शहरांत राहिलेंच पाहिजे, असा जो नियम होता तो मोडून टाकला. त्या बरोबर अल्पावकांशात सर्व दायमियो सर्व देशभर पसरले. कित्येकजण कियाटो येथें मिकाडोजवळही जाऊन राहिले. मिकाडोनेंही पुढें तहनाम्याला आपली अनुमती दिली; व शिवाय "कोणाही जपानी गृहस्थानें परवानगीशिवाय जपानदेश सोडून जाऊं नये " अशी जी पूर्वी परदेशगमनाला बंदी होती तीही त्याने मोडून टाकली.

 इ. स. १८६६ सालीं तो छोटा शोगुनही वारला. त्याच्यामागून कैकी नांवाचा शोगुन अधिकारारूढ होतो न होतो, इतक्यांत १८६७ ह्या सालाच्या अवलीलाच मिकाडो मरण पावला; व त्याच्या मार्गे त्याचा मुलगा 'मुट्- शुहिटी' नांवाचा गादीवर बसला. परंतु ह्या सर्व भानगडी घडून येईपर्यंत होतकरू जपान्यांच्या मनोवृत्तींत महदंतर दिसून येऊं लागलें होतें. कारण कीं त्यांच्यापैकी पुष्कळजण अमेरिका व युरोप इकडे प्रवास करून आले होते. तेथील सुधारणेच्या संस्था, तेथील राज्यपद्धति, तेथील लोकांचा स्वदेशाभिमान, व तेथील लोकांची स्वातंत्र्यप्रियता वगैरे गोष्टी त्यांच्या अवलोकनांत आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा असा पक्का ग्रह झाला होता कीं, परराष्ट्रीय लोकांच्या संघ-