पान:जपानचा इतिहास.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
जपानचा इतिहास.

चिनी लोकांनासुद्धां नागासाकीशिवाय इतर कोठें राह ण्याची परवानगी नव्हती.

 जपान परदेशी लोकांना खुले झालें - सुमारें दोन · शतकेंपर्यंत जपानची वरील स्थितीच कायम होती. पुढे युनायटेड स्टेट्सच्या सरकाराला जपानाशी आपला स्नेहसंबंध असणें फार अगत्याचे वाटू लागलें. कारण त्यांचे चिनाशीं बरेंच दळण वळण असल्यामुळे व चीन व अमेरिका ह्या दोन देशांच्या मध्यंतरी जपान देश असल्यामुळे आपल्या आगबो टीना कोळशांचा मध्यंतरी पुरवठा करण्याकरितां जपानच्या बंदराला आपल्या आगबोटी लावणें अमेरिकन लोकांना फारच अगत्याचें होतें. १८५३ ह्या साली युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटानें कमोडार पेरी याज बरोबर चार लढाऊ जहाजें देऊन व जपानच्या बादशहाला अमेरिका व जपान ह्या दोन देशांत तह करण्याविषयीं विनंतिपर पत्र देऊन येड्डोच्या आखातांत पाठविलें. तेव्हां जपानी सरकारानें पेरीला कळ- विलें कीं, तुह्माला जें काय बोलावयाचें असेल तें नागा- साकी बंदरांत येऊन बोला. कारण कीं, इतर कोणत्याही टिकाणी आह्मी आजपर्यंत परकीयाशीं व्यवहार ठेवीत आलों' नाहीं. परंतु पेरीने नागासाकी येथे येण्याचे नाकबूल केलें. तेव्हां जपान सरकारानें एक बडा अधिकारी पेरी याजकडे समुद्रांत पाठवून त्याजकडून प्रेसिडेंट यांचे पत्र आणविलें. नंतर उत्तराकरितां आपण पुढच्या वर्षी पुन्हां येऊ असे सांगून पेरी निघून गेला.

 आतां परद्वीपस्थ लोक आपल्या देशांत येऊन राहणार हे आपणावर अरिष्ट येणार, असे वाटून जपानी लोकांनी