पान:जपानचा इतिहास.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
जपानचा इतिहास.

निकटच्या प्रधानमंडळाशिवाय त्याचें तोंड इतर कोणाच्याही दृष्टीस पडत नसे. बाकी कांहीं जनांना राजाचें भाषण तेवढं ऐकण्याचा हक्क होता. त्यावेळेला सुद्धां राजा पडद्याच्या आड बसून बोलत असे. राजाचा पाय कधींही जमिनीला लागतां कामा नये. त्यानें कोणताही पोषाक दोनदां घालावयाचा नाहीं. त्याने एकदा वापरलेला जिन्नस त्यानें काढल्याबरोबर जाळून टाकावयाचा. कोठें बाहेर जावयाचे झाले तर मोठ्या मुशो- भित अशा रथांतून तो जात असे; परंतु रथ कधींही उघडा असावयाचा नाहीं. नेहमीं झांकलेला !

 एकामागून एक पुष्कळ घराण्यांतील शोगुनांनी राज्य केलें. १८६७ साली जेव्हां शोगुनांची सत्ता लयाला गेली, त्यावेळी टोकुगावा घराण्यांतील शोगुनचा अम्मल होता. त्या घराण्याचा मुळपुरुष इयेय नांवाचा होता. तो मोठा धोरणी व हिकमती असे. दायमियोंचा जोरा आपणावर चालू नये व त्यांनी नेहमीं आपल्या आवाक्यांत असावें, ह्मणून त्याने असा कायदा करून ठेवला की, दरएक दायमियोनें येड्डो राजधानींत वर्षां- तून सहा महिने तरी राहिलेच पाहिजे व बाकीच्या सहा माहीत आपली बायकापोरें राजधानींत ओलीस ठेविलीं पाहिजेत.

 जपानांत परकीयांना येण्याची बंदी - जपानांत इतर सर्व युरोपियन लोकांपूर्वी पोर्तुगीज जाऊं लागले. पहिला पोर्तुगीज गृहस्थ १५५२ ह्यावर्षी जपानांत गेला. त्यानंतर उच, स्पानियर्ड, वगैरे युरोपियन व्यापारी एकामागून एक जपानांत जाऊं लागले, व कांहीं काळपवितों कोणासही जपानांत येण्याची बंदी नव्हती. परंतु पुढें एकदां असें झालें कीं,