पान:जपानचा इतिहास.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वे.

८९


लेला असावयाचा. ' नाविष्णुः पृथ्विपतिः ' ही कल्पना आझाप्रमाणें जपानी लोकांतही आहे. परंतु ज्याप्रमाणें इकडे महाराष्ट्रांत शाहू राजाच्या नांवाने बाजीराव मुकत्यारीने राज्यकारभार करीत होते, त्याचप्रमाणें कित्येक दिवस मध्यंतरी मिकाडोच्या हातची सर्व सत्ता जाऊन शोगून सेनापति- करील ती पूर्वदिशा, असा प्रकार जपानांत चालू होता.

 ह्या शोगुनगिरीची उत्पत्ती मूळ ८१३ ह्यावर्षी झाली. त्या सालीं कोणा 'वटमारो' नांवाच्या एका दायमियोला उत्तरजपानांत 'ऐनो' लोकांवर स्वारी करण्याकरितां पाठविलें. त्यावेळी त्यास “सै-इ-टाइ - शोगून " ह्मणजे " वन्यनर- विध्वंसक = सेनापति" अशी पदवी देण्यांत आली. त्यानंतर ही पदवी अशा प्रसंगी वेळोवेळी देऊ लागले.

 अकराव्या व बाराव्या शतकांत 'टैरो' घराण्याची व 'मिना- मोटो ' घराण्याची आपल्या हातीं राज्यसूत्रे घेण्याविषयीं मोठी झटापटीची स्पर्धा चालली होती. त्या उभयतां घराण्या- मध्ये अनेक रणें झाली. त्यांचा वैराग्नि धुमसत असतां जपानला कसली ती शांतता अनुभवण्यास सांपडली नाहीं. अखेर शेवटीं ११८५ ह्या वर्षी टैरो घराण्याचा एका समुद्रां - तील लढाईत पुरा मोड झाला. व नंतर मिनामोटो घराण्याचा मुख्य पुरुष जो ' यारिटोमो' तो सर्व सत्ताधारी बनला. त्यानें मिकाडोकडून आपणास ' शोगुन' ही पदवी प्राप्त करून घेतली; व तेव्हांपासून इ. स. १८६० पर्यंत जपानचें राज्य वास्तविक एका मागून एक येणारे शोगुन करीत होते.

 राजाच्या हातीं कांहीं एक सत्ता नव्हती. राजा ह्मणजे देव असें मानीत. त्याच्या बायकांमुलांशिवाय अगर अगदी