पान:जपानचा इतिहास.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वै.

८७


 मृताच्या शरीराची व्यवस्था – प्रेतें बहुधा एखाद्या बौद्ध देवालयाच्या जवळच्या स्मशानभूमीत पुरण्याची वहि- वाट आहे. मेल्यानंतर प्रेताचे हातपाय रगडतात व कानांत नाकांत व तोंडांत एक प्रकारची पूड घालतात; नंतर त्या प्रेतास एका वाटोळ्या व मोठ्या अशा पांढऱ्या लांकडी पेटींत चोवीस तासपर्यंत बसवून ठेवतात. थडग्यावर एका दगडावर मृताचें नांव, गांव, तो कधीं जन्मला, कधीं मेला, वगैरे हकीगत लिहिलेली असते, व तसलीच हकीगत एका ainst फळांवर लिहून ती फळी देव्हाऱ्यांत ठेवतात.

 बौद्ध धर्माचा जपानांत प्रसार झाल्यापासून तेथे प्रेत जाळण्याची वहिवाट पडली आहे. अगदी पहिल्या प्रथम हा प्रेते जाळण्याचा प्रचार इ. स. ७०० च्या सुमारास पडला - ज्यादा प्रथमतः जाळण्यांत आलें या मनुष्याचें नांव ' डोशो ' असे असून तो बौद्धधर्मीय यति होता. त्यावेळेपासून पुढे थोर थोर लोकांनासुद्धां हीं प्रेते जाळण्याची वहिवाट पसंत वाटू लागली. तथापि १६५४ पासून कोणच्याही 'बादशहाचे प्रेत जाळण्यांत आले नाहीं.

 चीनी लोकांत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणें - जपानी लोकांतही सुतकासंबंधानें सक्तीचे नियम आहेत. त्यांत दोन भेद आहेत - एक विवक्षित प्रकारचा पोषाक करणे व दुसरा मांसाहार वर्ज करणें. त्याची मुदत खाली दिल्याप्रमाणें आहे.

आजा किंवा आजी मेल्यास....
आई किंवा बाप मेल्यास....
नवरा मेल्यास.....
पोषाख.१५० दिवस.
५० दिवस.
९० दिवस.
अन्न.३० दिवस.
१३ महिने.
१३ महिने.