पान:जपानचा इतिहास.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
जपानचा इतिहास.

शतके जपान देशांत रूढ होता. एक त्या वेळेपुरता लहा- नसा चौथरा केलेला असे. त्या चौथऱ्यावर तो अपराधी मनुष्य चढे, व त्यावर तो आपलें तोंड उत्तरेकडे करून गुढगे टॅकून बसे. त्याचे आप्तइष्ट व त्याप्रसंगाकरितां ज्यांनीं साक्ष भरावयाची तें त्याच्या भोंवती गराडा घालून लांब उभे राहत असत. नंतर तेथे आलेला सरकारी अंमलदार त्याची शिक्षा त्याला वाचून दाखवून त्याच्या हातीं एक कट्यारीवजा तरवार देत असे. नंतर अपराधी मनुष्य आपली शेवटची इच्छा प्रद- शित करून व पुन्हां एकवार आपणाजवळ असणाऱ्या आपल्या मित्रांस आपण कट्यार पोटांत भोसकून घेतल्या- बरोबर आपला शिरच्छेद करण्याविषयीं ' विनंति करून आपल्यापुढे केलेली कट्यार आपल्या डाव्या हातांत घेई; व ती तो आपल्या पोटांत बेंबीच्या खालीं खुपसून घेई. त्या- बरोबर त्याच्या शेजारी उभा राहिलेला त्याचा मित्र त्याचें डोकें धडापासून वेगळे करी.

 'हरकिरी' करतेवेळी एखाद्यानें भयाचे थोडेंही चिन्ह दाखविलें तरी तो तिरस्काराला पात्र होई. 'हरकिरी' ज्यानें केली त्याने पूर्वी कसलेही महान् दोष केले असले तरी त्या सर्व दोषांसून तो मुक्त होई व त्याला सन्मानपूर्वक नेऊन पुरीत असत.

 'हरकिरी' करते वेळी आपले पोट फाडून पुन्हां आपला गळा कापून ज्या कोणाला ती कट्यार पुन्हां म्यानांत ठेव- ण्याची शक्ति व वारिष्ट रहात असे, त्याची फार वाहवा होई. तो अत्यंत शूर मानला जाई, व त्याच्या धैर्याचे पोवाडे पिढ्या नुपिढ्या गात असत.