पान:जपानचा इतिहास.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वै.

८५


 पुष्कळ स्त्रियांनी हा धंदा केवळ आपल्या आईबापांच्या मर्जीखातर नाखुषीनें पत्करलेला असतो. कियेक स्त्रियांना त्यांच्या लहानपणींच त्यांच्या आईबापांनों असल्या स्त्रियांचीं दुकानें ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना विकलेल्या असतात. कधीं कधीं आपल्या आईबापांचे कर्ज फेडण्याकरितां त्यांच्या मोठ्या मुली कांहीं दिवस हा धंदा करून पुन्हा घरी येऊन राह- तात. अशा प्रसंगी त्या आईबापांना वास्तविक दोष द्याव- याचा, परंतु तसें न करितां शेजारीपाजारी उलट त्यांच्याविषयीं दया दाखवितात.

 आत्मघात — शत्रूच्या हातीं जिवंत सांपडून आपली अप्रतिष्ठा होऊं नये ह्मणून जपानी लोक अशाप्रसंगी आत्म- ) हत्या करून घेत असत. प्रत्येक जपानी शिपायाजवळ नेहमी दोन तरवारी असत. एक शत्रूशी लढण्याकरितां ह्मणून लांबशी असे, व दुसरी आखूड असे. त्या दुसऱ्या आखूड तरवारीच्या ऐवजी कोणी कोणी एखादी कट्यारही बाळगीत असे. आत्महत्या करण्याचा प्रसंग आला म्हणजे ह्या आखूड तरवारीचाच उपयोग करीत असत. अशा रीतीनें जीव देण्याच्या क्रियेस ' हटकिरी' असें नांव दिलें होतें. त्याचा शब्दशहा अर्थ केला तर 'पोट फाडणें ' असा होतो. एकाद्या सरदारानें अगर एकाद्या शिपायानें एकादा गुन्हा केल्यास व त्या गुन्ह्यास शिरच्छेदाची शिक्षा असल्यास त्या सरदाराचा अगर त्या शिपायाचा शिरच्छेद इतर लोकां- चा शिरच्छेद करणाऱ्या मांगाकडून न करवितां नेमल्यावेळीं व नेमल्या ठिकाणी साक्षीदारांसमक्ष त्याची त्यालाच हर- किरी' करण्याची परवानगी द्यावी, असा परिपाठ कित्येक
6