पान:जपानचा इतिहास.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
जपानचा इतिहास.

सगळा दिवसभर चालूच असतें. ह्मणून लोक नाटकाल येतेवेळी बरोबर भात, भाकरी, चहा, मेवामिठाई वगैरे सा- मुग्री घेऊनच येतात. गलिच्छ ठिकाणांचे देखावे किंवा खुनाचे देखावे रंगभूमीवर आले ह्मणजे जपानी लोक टाळ्या पिटून त्यांची वाहवा करितात.

 नाटकानें नीति विघडते अशी कित्येक जपान्यांची सप- जूत आहे, ह्मणून ते नाटकें पहावयास जात नाहींत. सभ्य गृहस्थांच्या मुली बहुतेक कधीं नाटकें पहावयास जात नाहीतच. तथापि सामान्य जनामध्यें नाटकाविषयीं फार प्रीति असते.

 जपानामध्ये कलावंतिणींचा जो वर्ग आहे त्यास 'ठौशा ' असें ह्मणतात. ह्या कलावंतिणी आमच्या देशांल्या कला. वंतिणीप्रमाणेच नीतीनें भ्रष्ट असतात. त्यामुळे ज्या ललित- कला त्यांच्या सहवासानें असतात, त्यांची योग्यता अगदीं कमी होऊन गेली आहे. ही उणीव ज्याप्रमाणें जपानांत त्याचप्रमाणे आमच्या देशातही आहे. ती भरून काढण्याचा आमच्यांतील पुढाऱ्यांनी अवश्य विचार केला पाहिजे.

 वारांगनांची जपानांत बरीच गर्दी आहे. त्यांची वस्ती शहारांतील एका पृथक् भागांत असते. त्यांपैकीं किलेकींचीं घरें बरीच विस्तृत व शोभायमान असतात, जुन्या धर्माचा ह्या असल्या बदफैली स्त्रियांवर पहिल्यापासूनच असावा तसा . कटाक्ष नाहीं आहे. देवाला जाण्याच्या रस्त्यांतसुद्धां विश्वयो- पितांची घरें असतात. पश्चिम जपानांतल्या एका शहरांत तर रस्त्याच्या एका बाजूला ह्या हलक्या स्त्रियांची घरें व दुसऱ्या बाजूला बौद्धधर्मीयांची देवालयें असा प्रकार आहे.