पान:जपानचा इतिहास.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जपानचा इतिहास.

दाखविलें आहे कीं, ज्या सुधारणांचें ग्रहण करण्यात मागच्या काळी इतर राष्ट्रांस अनेक शतकें लागली, त्या सुधारणा त्या राष्ट्रांच्या मदतीनें ग्रहण करण्यास हल्लींच्या काळी इतर राष्ट्र अल्पावकाशांतही समर्थ होतात. हाच सिद्धांत पूर्वी अमेरिकन लोकांनींही सिद्ध करून दाखविला होता; परंतु तें पडलें पाश्चात्य राष्ट्र, त्यामुळे तो सिद्धांत पौरस्त्य राष्ट्रांना लागू करतेवेळी मन साशंकित होत असे. पण आतां अल्पकाळांत झालेल्या जपानच्या अभ्युदयार्ने पौरस्त्य राष्ट्रांविषयींची शंका पार निघून गेली आहे. शिक्षणासा- रख्या जबर मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर अंधकाररूप पिशाच्च पार निघून जाते. पण ते शिक्षण व्हावें त्या दिशेनें, व्हावें तितकें झार्ले पाहिजे. आमच्या देशांतही आमच्या दयाळू इंग्रज सर- कारांनी आह्मांला-जपानी लोकांना शिक्षण मिळू लागण्यापूर्वी पासूनच-शिक्षण देण्यास आरंभ केला आहे. परंतु आमचें शिक्षण केवळ एकदेशीय असल्यामुळे, जे आह्मी आज जपानच्या कांहीं तरी पुढे असणारे, ते त्याच्या किती तरी मागे पडलों आहों ! असो. आज निदान जपानचा इतिहास तरी डोळ्यापुढें घेऊन आपणास आपल्या जितक्या सुधारणा करणे शक्य असतील तितक्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

_______
प्रकरण २ रें.
____
जपानचा विस्तार, वगैरे.

 मोठी मोठी चार व बाकी लहान लहान हजारों बेटे मिळून जपान देश झाला आहे. सर्वांत प्रमुख असें जें होंडो ( स० मुख्य भूप्रदेश ) बेट ते ब्रिटन ह्मणजे इंग्लंड व