पान:जपानचा इतिहास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रें.


स्कॉटलंड हे दोन देश मिळून जें एक बेट झालें आहे, त्या बेटाएवढे आहे. आकाराने त्याच्या खालोखाल असें येझो बेट उत्तरेला आहे. कियुशियु (नऊ प्रांतांचा समुदाय) व शिकोकु (चार प्रांताचा समुदाय ) हीं दोन्हीं बेठें होंडोच्या आग्नेयेला आहेत.

 कामश्चाटक्का व येझो यांच्या दरम्यान कुराइल नांवाच्या खडकाळ बेटांची एक लांबच लांब माळ आहे. ह्या बेटांतून ज्वालामुखी पर्वत अतोनात असल्यामुळे रशियन लोकांनी त्यांस ' कुराईल ' ह्मणजे ' धूम्रपान करणारे ' असें अन्व- र्थक नांव दिलें आहे. हीं बेठें पूर्वी रशियाकडे होती. परंतु इ. स. १८७५ साली ' दक्षिण शांघालियन ' जपान सरकारा- कडून आपणाकडे घेऊन रशियन सरकारने त्यास हीं बेटें त्याच्या मोबदला दिली आहेत. ह्या बेटांशिवाय जपानामध्यें महत्वाचीं बेठें झटलीं ह्मणजे जपान व फोर्मोसा ह्या दोहोंच्या दरम्यान असणारी ' लुचू' नांवाचीं पोंवळ्यांची बेटे होत. ह्या बेटांस जपानी संज्ञा ' कियुशियु ' बेटे अशी आहे.

 संपूर्ण जपानचें क्षेत्रफळ एक लक्ष सत्तेचाळीस हजार चौरस मैल आहे, व लोकसंख्येचें गणित जवळ जवळ चार कोटी आहे. आमचा मुंबई इलाखा ह्यापेक्षां विस्तारानें किंचित् लहान आहे, व लोकसंख्येचें मान पाहतां फारच लहान आहे. मद्रास इलाखा व त्या इलाख्याखालची संस्थान मिळून, विस्तार व लोकसंख्या जपानच्या बरोबर येईल.

 निसर्गागत गुणधर्म - जपान हा देश समुद्रांतून वर आलेल्या पर्वतावर वसलेला आहे. भूप्रदेश सोडून