पान:जपानचा इतिहास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.


अंगी अगदी अल्पावकाशांत जपानने आणली " हैं होय. आपली स्वतःची उन्नति करण्याची हाव जपाननें आलीकडे जितकी व जशी दाखविली आहे, तशी व तितकी हात्र अन्य कोणत्याही प्राच्य राष्ट्राने दाखविली नाहीं. आज सहाशे वर्षांपूर्वी ज्या राष्ट्राचें कोणास नांबही ठाऊक नव्हतें, व परवां १८६८ पर्यंत जें राष्ट्र केवळ अज्ञानांवकारांत लोळत पडलें होतें, त्याच राष्ट्राची आज केवढी दीप्ति प्रकाशत आहे ! चीन- सारख्या अतिप्राचीन—इतकें कीं, होकायंत्रादि सुधारणेच्या शतकांतील ज्या युक्त्या आपण शोधून काढल्याबद्दल पाश्चात्य लोक घमेंड मारीत होते, त्या युक्त्या त्यांच्यापूर्वीच ज्या राष्ट्रां- तील लोकांना अवगत होत्या, त्याचप्रमाणे अमेरिका खंड शोधून काढल्याबद्दल कोलंबसाची फुशारकी ज्या राष्ट्रानें निरर्थक ठरविली, अशा ह्या अतिप्राचीन व आजपर्यंत अति बलाढ्य अशा चीनचाही पराक्रम त्यानें आज फिक्का पाडला आहे. आपण कोण, हें चांगले जाणून त्याप्रमाणें वर्तनाचें धोरण ठेवण्यानेंच ह्या छोटयाशा द्वीपाची इतकी दिगंत कीर्ति पसरली आहे. साहस, एकी, व उद्योगप्रियता इत्यादि गुणपरंपरेमध्ये आज पश्चिमेकडे ज्याप्रमाणे इंग्लंड, त्याप्रमाणें पूर्वेकडे जपानदेश होऊं पाहात आहे. ' पश्चिमेकडील सुधा- रणारूप वृक्षाची जोपासना पूर्वेकडील देशांमध्ये वातावरणादि गोष्टींच्या भिन्नत्वामुळे चांगलीशी व्हावयाची नाहीं, ' असा एक आक्षेप, हिंदुस्थानच्या लोकांना ब्रिटिश प्रजेचे हक देते वेळी-प्रबुद्ध परंतु हट्टी अशा आंग्लो-इंडियनांकडून आजप- र्यंत आणला जात असे. त्यांना दाखविण्यास जपान हें एक उत्तम उदाहरण झाले आहे. जपानने इतकें सिद्ध करून