पान:जपानचा इतिहास.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वै.

८३


लागलेली असते. सृष्टिसौंदर्याविषयीं जीं स्थळें आख्येचीं आहेत तेथे वनभोजनालाही जाण्याचा त्या लोकांचा प्रघात आहे.

 पत्ते, गंजिफा, बुद्धिबळें वगैरे खेळ खेळण्याची चटक मजूर लोकांनासुद्धां असते. एकप्रकारचा पत्त्यांचा खेळ तर त्या लोकांना इतका प्रिय झाला आहे कीं, पैसे लावून पैजेनें तो खेळण्याची बंदी करणें सरकारला भाग पडलें.

 जपानांत गारुडी, जादुवाले वगैरे पुष्कळ आहेत व त्यांच कित्येक खेळ चित्तवेधक होतात. कुस्ती पहावयाला जा- ण्याची जपानी लोकांना फार हौस आहे. इतर जपान्यांच्या मानानें पाहिलें असतां जपानी पैलवान बरेच उंच व धष्टपुष्ट असतात. कुस्ती खेळतेवेळी त्यांच्या आंगावर वस्त्र हाणावयाला कंबरेला एक लंगोटा असतो तेवढेच. कुस्ती खेळण्याची पंचांनीं खूण दिल्याबरोबर ते दोघे पैलवान एकमेका समोर येतात. एकमेकांच्या आंगावर उडी टाकण्याची संधि मिळावी ह्मणून दबा धरून बसतात. कैक प्रसंगी अशांतच अर्धा अर्धा तास मोडतो, व कंटाळा आला ह्मणजे विश्रांति घेऊन पुन्हां मग खेळण्यास आरंभ करितात.

 जपानामध्ये धर्मसंबंधीं नृत्यगायन करण्याची फार प्राचीन काळापासून चाल आहे. परंतु नाटक अशी ज्याला संज्ञा देतां येईल, असे खेळ रंगभूमीवर सोळाव्या शतकापासूनच होऊ लागले. जपानी नाटकांची पद्धत आमच्या नाटकाहून जरा भिन्न आहे. आमच्या इकडच्याप्रमाणेंच मुर्लेच स्त्रियांचीं सोंग घेतात. नाटकाच्या धंद्यामध्यें अजून स्त्रिया शिरू लागल्या नाहींत, जपानी नाटक एकदा सकाळी सुरू झालें ह्मणजे