पान:जपानचा इतिहास.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
जपानचा इतिहास.

प्रकरण १६ वें.
________
कांहीं जपानी चाली.

 नम्रपणा व लीनता - जपानी लोक चिनी लोकांप्र- माणें मोठें लीन व आदरातिथ्यशील असतात. त्यांच्यांत नेह- मीची नमस्काराची पद्धति झटली ह्मणजे खालीं वांकून गुढ- ध्यावर हात टेंकर्णे, साष्टांग नमस्कार घालणे, हें अधिक स न्मानदर्शक समजतात. कोणी कोणास एखादी वस्तु दिली तर स्वीकरण्यापूर्वी तो कृताज्ञतापूर्वक आपली मान वाकवितो. ज- पानी मुलें घरांतून बाहेर जातेवेळी आईच्या पायांपडून तिची अनुज्ञा घेतल्याशिवाय सहसा जात नाहींत. बाहेरून आल्या- बरोबरही आधी आपल्या आईच्या पायां पडतात. आई कोठें बाहेर जाऊन आली ह्मणजे घरांतील मुलें व चाकरमाणसें उंबऱ्याजवळ येऊन तिच्यापुढे नाक घासतात. व ती परत आल्याबद्दल शब्दांनी तिचें स्वागत करून आनंद प्रदर्शित करितात. आलीकडे युरोपियन विद्यांचा जपानांत प्रसार झाल्यापासून तरुण जपान्यांच्या आंगची ही लीनता जात चालली आहे.

 करमणुकी - सर्व प्राच्य राष्ट्रांत जपानी लोक फुलांचे मोठे शौकीन दिसतात. दररोज संध्याकाळी फुलें विकणारांच्या दुकानापुढें गिन्हाइकांची अति गर्दी असते, त्या गि-हाइकांमध्यें सर्व थोर लोकच असतात असें नाहीं. तेथें सामान्यजनसंमर्दही बराच असतो. एखाद्या प्रसिद्ध ठिकाणीं एखाद्या आवडत्या फुलझाडाला फुलांचा बहार आला आहे, असें कळतांच तें पाहण्यास जाण्याकरितां तिकडे लोकांची एकसारखी रीग