पान:जपानचा इतिहास.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वै.

८१


 आहे. तथापि आज एक हजार मैल विस्ताराचीही आगगाडीची सडक तयार झाली आहे. पहिली रेल्वे तयार करण्याचें काम जपानी लोकांनी इंग्लिश इंजिनियरच्या मदतीनें इ. स. १८६९ साली आरंभिलें व तें इ. स. १८७२ साली तडीस गेलें. ही लाईन टोकियो व टोकियोचें बंदर याकोहामा यांच्या दरम्यान असून अठरा मैल लांबीची आहे. टोकियो व कियाटो ह्या दोन्ही राजधानींच्या दरम्यान आतां आगगाडी झाली आहे व इतर फाटेही पुष्कळ झाले आहेत. जपानी लोकानां प्रवास करण्याची फार हौस असल्यामुळे रेल्वेला चांगलीच किफायत होते.

 पुष्कळ वर्षांपूर्वी जपानी लोकांजवळ मोठमोठी जहाजें अ- सत. तीं सयामपर्यंत सुद्धां सफर करून येत असत. विल अडॅम्स नांवाचा एक इंग्लिश दर्यावर्दी इ. स. १६०० शें ह्यावर्षी जपानामध्ये गेला होता. त्यानें जपानी सरकाराकरितां कांहीं गलबतें तयार करून दिली. तीं गलबतें मेक्सिकोपर्यंत सफर करून येत असत. परंतु १६२४ ह्या साली त्या सर- कारने सर्व मोठमोठीं गलबतें मोडून टाकून किनाऱ्यालगत ज्यांचा उपयोग करितां येईल अशीं लहान लहान तेवढीं ठेवलीं. परंतु चालूं सरकाराने ते सर्व निर्बंध मोडून टाकून जहाजे व आगबोटी तयार करण्याला वारंवार उत्तेजन दिलें आहे. १८७० साली एका धनाढ्य जपान्यानें किनान्या किनान्याने चालणाऱ्या पुष्कळ आगबोटी तयार केल्या. हल्लीं " जपान मेल स्टीमशिप कंपनी ' नांवाची एक मंडळी स्थापन 'झाली आहे. तिच्या आगबोटी चीन, सैबारिया व मॅनिला देशाला सुद्धां जातात. १८८७ साली परदेशी चालीच्या १२८४ आगबोटी होत्या.