पान:जपानचा इतिहास.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
जपानचा इतिहास.

आतां घोड्यावर बसून हिंडतात. पूर्वी सर्वसामान्य वाहन ह्मणजे 'गो' नांवाचें पालखीसारखें एक होते. सरदार वगैरे जे थोर लोक तेही केगोच्याचसारखी पालखी वापरीत. परंतु त्यांच्या पालख्यांना दाखी रंग दिलेला असे व त्यांस नॉरिमोन असें ह्मणत असत.

 इ. स. १८६७ च्या सुमारास एका गृहस्थानें एक प्रका रची हलकी गाडी काढली आहे. त्यावेळेपासून आतां लोक त्याच गाडीचा उपयोग करितात. त्या गाडीला जिन्निकिश- ( मनुष्य-शक्ति · बाह्य- रथ ) – असें ह्मणतात. कारण कीं ती गाडी ओढण्याला घोडे बैल वगैरे कांहीं लावीत नसून माणसेच ती गाडी ओढून नेतात. ही गाडी लहान असून हिला दोन चाके असतात. त्या गाडीत माणूस बसल्याबरोबर एक गडी दोन्ही दांड्यांच्या आंत होतो, व त्या उचलून हातानें गाडी ओढं लागतो. लांबच्या प्रवासाला जावयाचें असले किंवा कोठें जलदीनें जावयाचें असलें, झणजे गाडी ओढण्यास एकाच्या जागी दोन गडी लावतात. हल्ली ह्या गाड्यांचा प्रसार चीन व मलाया इकडे सुद्धां झाला आहे. सीलोनांत व हिंदुस्थानांतही कोठें कोठें जिंरिकिश आढळतात.

 जपान देश डोंगराळ असल्यामुळे तेथें आगगाड्यांचा मार्ग करण्यास फार यातायात पडते, शिवाय जपानांतल्या नद्या व 'ओढे कसे असतात, तें वर्णन मागें दिलेंच आहे. उन्हाळ्यांत जेथें डोळ्याला लावायलाही पाणी नाहीं, अशी सिकतामय नद्यांचीं पात्रे, पावसाळ्यांत एकदा पाऊस पडला हणजे अशी फुगून जातात की, त्या सपाट्यांतून वाचण्याचा पूल करावयाचा ल. णजे मोट्या कौशल्याचें, जोखमेचें व त्याचप्रमाणें पैशाचें काम