पान:जपानचा इतिहास.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वे.

७९


कांहीं दिसून येतें हें खरें, तरी नेहमीं बहुधा चिनी वर्तीवर चित्रे काढण्याचा प्रयत्न चालला असतो. कांहीं चित्र मोठीं चित्तवेधक व रम्य दिसतात. चित्रांतील रंग फार चकचकीत असतात. फूजी पर्वत, बगळे व फुले हे जिन्नस त्यांच्या चि- त्रपटांत फार येतात. कांहीं कांहीं जपानी पडदे चांगलेच चित्तरंजक असतात. जपानी लोकांना दर्शनानुशासनपद्धतीनें चित्रे कशी काढावी, तें अजून चांगलेसें कळू लागलें नाहीं.

 कलाकौशल्याच्या कामांत सर्व एशियाटिक देशामध्यें जपानचा पहिला नंबर लागेल. यूरोपांतील एकूणएक प्रसिद्ध ठिकाणीं जपानी माल विकण्याकरितां दुकानें पृथक् पृथक् घातली आहेत, व त्या दुकानांत जपानी मालाचा खप उत्कृष्ट तऱ्हेने होत आहे. आजकाल जपानांतून प्रतिवर्षी ३५ लाख रुपये किंमतीच्या शोभेच्या वस्तु बाहेरदेशीं रवाना होत आहेत. ह्या प्रकारेंकरून देशांतल्या लोकांना भरपूर पैसा मिळून देशाला सांपत्तिक फायदा होतो.

______
प्रकरण १५ वें.
---००००-
जपानी लोकांची प्रवास करण्याची रीति.

 पूर्वी जपानांत अशी चाल असे कीं, कोणा पदवीवान गृहस्थाखेरीज इतर कोणीही शहरांत घोड्यावर बसून जाव- याचें नाहीं. शहराबाहेर देखील कोणी गृहस्थ घोड्यावर बसून चालला असतां, जर त्याच्या समोरून त्यांच्यापेक्षां मोठ्या पदवीचा मनुष्य येतांना त्याने पाहिला, तर त्याला चटकन घोड्यावरून खाली उतरून पायीं चालावें लागे. परंतु आतां ह्या चाली बंद झाल्या असल्यामुळे पहिल्यापेक्षां अधिक लोक