पान:जपानचा इतिहास.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
जपानचा इतिहास.

 मातीची भांडी व चिनी मातीची भांडी-मातीचीं साधी भांडीं जपानी लोक अगदीं पूर्वकाळापासून करीत आले आहेत. परंतु ज्या चिनीमातीच्या अनेक सुंदर वस्तूंविषयीं आज जपानची इतकी प्रख्याती आहे, ती चिनीमातीची भांडी करण्याची कला ते लोक कोरिया देशांतून लढाईत धरून आणलेल्या कैद्यांकडून सोळाव्या शतकांत शिकले. कोरियन लोक मूळ ती कला चिनी लोकांपासून शिकले होते.

 जपानच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या घाटाची चिनी मातीची भांडी होतात. ही कला ते लोक फार कौश- त्यानें व काळजीनें उर्जित दशेस आणीत आहेत. चिनी मातीच्या भांड्यांनां ते इतकी तकाकी आणि इतका गुळगुळी- तपणा आणतात कीं, जणूं काय तीं कांचेच असल्याप्रमाणें दिसतात. कित्येक चिनी मातीची भांडी फार मौल्यवान् असतात.

 धातूंचीं कामें - ह्या कामांत जपानी लोक चांगले पटाईत आहेत. शेंकडो वर्षांपूर्वी 'जपानी लोकांच्या लोखंडी व पोलादी चिलखताविषयीं फार प्रख्याति असे. हल्लीं जपा. नी लोकांची काशाच्या जिनसाविषयीं फार प्रख्याति आहे. ह्या मिश्रधातूची कृति ते चिनी लोकांपासून शिकले, ह्मणून ते त्या धातूला चिनीधातु असें ह्मणतात. पूर्वी ह्या धातूचा मुख्यत्वेंकरून, आरसे, देवळांतील घांटा, कंदील व देवान्या मोठमोठ्या मूर्ति हेच जिन्नस करण्याकडे उपयोग करीत असत. परंतु आतां ते लोक तिच्या नानातऱ्हेच्या शोभेच्या वस्तू करून बाहेर मुलखी पाठवितात.

 चित्रे काढणें - ही कला जपानी लोक चिनी लोकां- पासूनच शिकले आहेत. जपानी चित्रांत जपानचे राष्ट्रीयत्व