पान:जपानचा इतिहास.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६.
जपानचा इतिहास.

करितां येत नसे. उच्च वर्गातील लोक त्यांच्या घरों कधीही जात नसत, व त्या लोकांशी ह्यांना अन्नव्यवहारही ठेवतां येत नसे. हिनिन ही भीक मागणारांची जात होती. फांशी दिलेल्या लोकांची प्रेतें वाहून नेऊन तीं पुरणें हा त्यांचा एक धंदा होता. त्यांनांही आपल्या जातीबाहेरच्याशी लग्न करण्याची मनाई असे.

 ईटास, हिनिन व इतर जाती ह्यांमधील भेद कायद्यानें इ. स. १८७१ ह्या वर्षों मोडून टाकण्यांत आला.

_______
प्रकरण १४ वे.
जपानांत कोणते धंदे विशेष भरभराटीत आहेत ?

  शेतकी - हा लोकांचा मुख्य धंदा आहे. ह्या लोकांनीं पर्वताच्या पायथ्याची जमीन तर लागवडीला आणलीच आहे; परंतु साधेल तेथें पर्वतांच्या बाजूलासुद्धां त्यांनी पेराऊ जमीन 'केली आहे. कांहीं कांहीं भागांत पाणी साठविण्याकरितां तळीं बांधली आहेत. त्या तळ्यांतून पाणी काढून तें जित्रपास पाजतात.

 रेशीम - पूर्वकालीं जपानी लोकांना रेशीम ठाऊक नव्हतें. तें कापसाचीं अगर तागाचींच वस्त्रे वापरीत. जपानी लोकांस इ. स. ४०० च्या सुमारास कोरियांतील लोकांच्या मार्फत रेशमाची प्रथम ओळख झाली असावी असें दिसतें. आतां जपानामध्यें रेशमाची उत्पत्ति मनस्वी होते. जपानी लोक रेशीम बाहेरदेशी पाठवून विपुल संपत्ति मिळवितात. तें रेशीम ते लोक परदेशी अनेक तन्हांनी पाठवितात. त्यांतल्या त्यांत जपानी रेशमी दस्तरुमालांचा बाहेरदेशीं खप विशेष होतो.