पान:जपानचा इतिहास.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वे.

७५


अपमान करणाऱ्याचे शिर ठेविलें. नंतर थोडक्याच वेळांत त्या सर्वांना हरकिरीची शिक्षा झाली. ती त्यांनी आपल्या पहिल्या धन्याच्या मरणानंतर ते ज्या ज्या दायमियोंच्या घरी चाकरीला राहिले होते, त्यांच्या त्यांच्या वाड्यांत अमलांत आणली. त्यांच्या धन्याचे प्रेत ज्या देवळांत होतें, त्याच देवळांत त्यांचीही प्रेत पुरण्यांत आली. आज तागाईत त्याठिकाणी त्यांची थडगीं आपणास पहावयास मिळतात.

 २ शेतकरी -- सामुराईच्या खालोखाल दर्जा ह्मणजे शेतकरी लोकांचाच. मोठमोठे जमीनदार असत त्यांना बरो- बर तरवार बाळगण्याचीही मुभा असे, सामान्यत्वेकरून जमीनीच्या उत्पन्नाचा निम्मा भाग दायमियोंना पोंचे, बाकीच्या वर्गात इतर शेतकरी वर्गाची वाटणी.

 ३ कारागीर —— नंतर लोहार, सुतार, कोष्टी इत्यादि - कांचा तिसरा वर्ग.

 ४ दुकानदार - ह्यांना फार हलक्या प्रतीचे मानीत असत. परदेशांतल्या व्यापाऱ्यांचा मान सन्मान केलेला पाहून सामुराईच्या तळव्याची आग मस्तकाला जाई. कारण त्या व्यापाऱ्यांची योग्यता ते आपल्या देशांतील दुकानदाराप्रमाणे अगदी कमी लेखीत असत.

 जातिवाह्य --- वर सांगितलेल्या सर्व वर्गांत अगदी कमी प्रतीचा वर्ग हाटला ह्मणजे इटास ( अमंगळ ) व हिनिन ( अमानुष ) लोकांचा होय. इटास लोक कातडी कमावण्या- चा व कातड्याचे जोडे वगैरे जिन्नस करण्याचा आणि प्रेता- करितां थडगीं उकरण्याचा धंदा करीत. ते शहराबाहेर पृथक जाग्यांत रहात. इतर वर्गांतील लोकांशी बेटी व्यवहार त्यांना