पान:जपानचा इतिहास.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
जपानचा इतिहास.

 कोणा ' किर' नांवाच्या एका सरदाराने येद्दो येथें शोगु- नच्या वाड्यांत कोणा 'असानो' नांवाच्या दायमियोचा फार अपमान केला, त्याबरोबर असानोनें आपली तरवार उपसली. व किराने केलेल्या अपमानाबद्दल त्यानें त्याचा शिरच्छेद केला असता; परंतु फिर पळून गेला ह्मणून वांचला. त्यावरून त्याच दिवशीं हरकिरी ( आत्मवात ) करण्याची नसानोला शिक्षा झाली. त्याची सर्व मालमत्ता जप्त झाली. त्याच्या घरां- तील सर्व लोक रोनिन झाले, असोनाच्या आश्रितांपैकी सत्ते- चाळीस आश्रितांनी आपल्या धन्याच्या अपमानाबद्दल सूड घेण्याचा निश्चय केला. आपल्या उद्देशाविषयीं दुसऱ्या कोणाला संशय येऊं नये ह्मणून व किराच्या वाड्यांतील बातम्या आप- णास समजण्यास अडचण पडूं नये ह्मणून त्यांच्यापैकी कोणी सुतार, कोणी लोहार व कोणी व्यापारी बनले. आपला इष्ट हेतु साध्य होण्यास्तव त्यांनी दोन वर्षेपर्यंत वाट पाहिली. नंतर एके दिवशीं बर्फाचा वर्षाव होत असतां, ह्या सत्तेचाळीस रोनिनांनी किराच्या वाड्यावर हल्ला केला, त्याचे लोक त्यांनी मारून टाकले, व तो जळाऊ लाकडांत लपून बसला होता, तेथून त्यांनी त्यास शोधून बाहेर काढले. त्यांच्या पुढाऱ्यानें त्यास हरकिरी करण्याविषयीं नम्रतापूर्वक विनंति केली. परंतु ती त्याने नाकारली. त्यावरून त्यांनी त्यास ठार मारलें.

 इतके झाल्यानंतर किराचें शिर घेऊन ते शहराच्या टोकाला असलेल्या देवळाकडे चालले. वाटेनें त्यांच्याबरोबर लोकांची फार गर्दी जमली. सर्व जणांनी त्यांच्या ह्या शूरपणाच्या कृत्या- बद्दल त्यांची तारीफ केली. देवळांत त्यांच्या धन्याचे प्रेत पुरले होते. तेथे आपल्या धन्याच्या थडग्यावर त्यांनी त्याचा