पान:जपानचा इतिहास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जपानचा इतिहास.

पुढे पुढे दाई हा शब्द प्रचारांतून जाऊन आतां बोलण्यांत वगैरे फक्त निप्पोन ही संज्ञा राहिली आहे.

 मार्को पोलो नांवाच्या ग्रीक प्रवाशाने माहिती करून देई- पर्यंत जपानाविषयीं युरोपियन लोकांमध्ये पूर्ण अज्ञान होतें. हा प्रवासी सुमारें सहाशें वर्षांपूर्वी होऊन गेला. 'जपानी लोक पुष्कळ सुधारलेले आहेत व त्या देशांत सोनें पुष्कळ आहे' असें ह्या प्रवाशानें, आपण आपल्या देशांत परत गेल्यावर आपल्या देशबांधवांस सांगितलें. तदनंतर कोलंब - साने जेव्हां पश्चिमेकडील सफर आरंभिली तेव्हां त्याचाही रोख निःसंशय जपानाकडे होता, असें मानण्यास पुष्कळ आधार आहे.

 मनोहर सृष्टिसौंदर्याबद्दल, वारंवार होणाऱ्या भूकंपां- बद्दल, असंख्यात अशा ज्वालामुखी पर्वतांबद्दल, आणि कलाकौशल्याच्या पुष्कळ कामांबद्दल तर जपानची प्रसिद्धी आहेच आहे. पण अलीकडे ह्या देशाकडे पाश्चात्य व पौरस्त्य लोकांचें जें सारखे लक्ष लागलें आहे, त्याचें कारण निराळे आहे. व्यापाराच्या व अनेक कलाकुशलतेच्या कामां- बद्दल चीनदेशाची ख्याति थोडी आहे असें नाहीं; परंतु आज ' काल त्या देशाबद्दल कोणास तितकें कौतुक न वाटत जपानाविषयी जे अलीकडे वाटू लागलें, त्याला मुख्य कारण झटलें ह्मणजे “ इतर देशांकडे लक्षपूर्वक नजर देऊन आणि परिस्थितीचें व कालाचें नीट विचारपूर्वक अवलोकन करून, त्या परिस्थितीला व कालाला योग्य अशा सुधारणा करून जगांत मी मी ह्मणविणारी जी यूरोपखंडांतील राष्ट्रें, त्या राष्ट्रांच्या मांडीस मांडी ठोकून बसण्याची योग्यता आपल्या