पान:जपानचा इतिहास.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वै.

७३


समरांगणावर जाऊन उभे राहणें, शांततेच्या वेळीं आपल्या धन्याच्या किल्ल्यावर पाहरा करणें, तो फिरावयास जाईल त्यावेळीं त्याच्याबरोबर असर्णे, व जत्रेचे वगैरे प्रसंग आपल्या पोपाकानिशीं हजर राहून साजरे करणें, हेंच काय तें त्यांचे कर्तव्य. एवढे बजावलें ह्मणजे कामगिरी संपली. लढण्याच्या कामांत पटाईत व शिकले सवरलेले असे त्यांच्यापैकी फारच थोडे असत. बाकीचे सर्व जणूं काय खाण्याकरितां, पिण्या- करितां, तंबाकू ओढण्याकरितां, व बदफैलीच्या घरांत जाऊन घाणेरडेपणा करण्याकरितांच जन्मले आहेत की काय असे वाटे. आपल्या तरवारींना उत्तम धार लावून, त्या म्या- नांत व आपल्या कंबरेला लटकावून रस्त्यांतून छाती वर करून इकडून तिकडे भिरविर्णे, ह्याशिवाय त्यांना दुसरी कोणतीही इतिकर्तव्यता ठाऊक नसे. इतर धंद्यांतील लोकांना ते नीच कुळांतील असें लेखीत असत व त्यांच्यापैकीं एखा- द्यानें आपला अपमान केला अशी निदान कल्पना झाल्या - बरोबर त्याची गर्दन छाटण्यांत त्यांना मोठी प्रतिष्ठा वाटत असे. सामुराई तरवार बरोबर घेतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नसे. शाळेला जातांनासुद्धां सामुराईचा मुलगा बरोबर एकतरी छोटीशी तरवार घेऊन जात असे.

 सत्तेचाळीस रोनिनांची गोष्ट - आपली घरेंदरें सोडून जे सामुराई अद्वातद्वा भटकत होते त्यांना रोनिन- झणजे लहरी गृहस्थ--असें नांव मिळालें होतें. सत्तेचाळीस रोनिनांची हाणून एक गोष्ट आहे. त्या गोष्टीनें आज एक- सारखीं दोनशे वर्षे प्रत्येक जपान्याचें अंतःकरण कळवळून सोडलें आहे.