पान:जपानचा इतिहास.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
जपानचा इतिहास.

असे. दायमियो प्रवासाला निघाला ह्मणजे आपल्या संपत्तीविषयी असा कांहीं भपका दाखविण्याचा प्रयत्न करीत असे कीं, त्याचे वर्णन वाचून आपणाला हंसूं आल्यावांचून राहत नाहीं. मोठमोठे गडे, पुष्कळशा छत्र्या, व अनेक पेट्या वगैरे सामान तो उगीच जरी प्रवासाला निघाला असला, तरी त्याच्या बरोबर असे. त्याच्याबरोबर असलेल्या पेट्यांपैकी बहुतेक पेट्या रिकाम्याच असत. परंतु त्यांत मौल्यवान् जिनसा असल्याचा ते आव घालीत असत. पालखीत बसण्याला दायमियोची स्वारी कंटा- ळली तर सामान घातलेले घोडे बरोबरच असत, त्यांतील एकावर ती बसे. दायमियोपेक्षां खालच्या दर्जाचे अधिकारी लोक दायमियोच्या स्वारीबरोबर पालखीतून किंवा घोड्यावर बसून येत असत. सगळ्या स्वारीच्या अघाडीला अंगांत रंगीत पोषाक घातलेले लोक हातामध्ये लांब लांब लोखंडी काठ्या घेऊन चालत. त्या काठ्यांना खेळत्या लोखंडी कड्या बसविल्या असत. वाटेने जातांना मध्येच एकाएकीं ते ह्या काठ्या हापटीत व लोकांना सुचवीत की 'थोर गृहस्थ येत आहेत, त्यांना योग्य सन्मान देण्यास तयार व्हा. तुझी जर आमचा मान राखणार नाहीं. तर ह्या शस्त्राच्या मदतीनें आह्मी तुमच्याकडून बळजबरीनें आपला मान राखून घेऊ. !'

सामुराईची घरें चार लाख होतीं. बहुतांशानें ते लोक अज्ञानी व आळशी असत. आपल्या यजमानाची आज्ञा पाळावी ह्याशिवाय त्यांना दुसरी कोणतीही गोष्ट ठाऊक नव्हती. आपल्या धन्याकरितां मात्र ते प्रसंगी प्राणाचीही आहुती देण्यास तयार असत. कारागीर लोकांना व विशेषतः दुकानदार लोकांना ते फार कमी लेखीत असत. लढाईच्या वेळेला