पान:जपानचा इतिहास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वें.

७१


पुढे आले, त्यांना दायमियो- नामांकित - है नांव मिळालें. हे दायमियो निरनिराळे किल्ले हस्तगत करून त्यांत पुढें अधि काधिक स्वतंत्रपणानें हूं लागले. ह्या दायमियोचे जितके अनुयायी होते, त्यांना सामुराई ही पदवी मिळाली.
  दायमियोंचा दरकार मोठा असे. त्यांच्यापैकी कोणी प्रवा. साला निघाला ह्मणजे पालखीबरोबर बरेचसे सामुराई घेत- ल्यावांचून तो निघत नसे. हा परिवार जितका अधिक असेल तितकी त्या दायमियोंची किंमत अधिक मानीत असत. ही दायमियोंची स्वारी रस्त्यानें चालली असतां जर कोणी गृहस्थ समोरून घोड्यावर बसून येत असला तर त्याला चटकन आपल्या घोड्यावरून खाली उतरावें व आपला घोडा रस्त्याच्या बाजूला घेऊन उभें रहावे लागे. त्यावेळी त्याच्या डोक्यावर टोपी, पागोटें कांही असले तर तेही त्याला काढावें लागे. रस्त्यानें दायमियोची स्वारी चालली असतां त्याच्या परिवारांतले दोन तरवारवाले सामुराई लोक वारंवार उद्धटप- जानें 'गुढगे टेका' ह्मणून ओरडत असत. त्याबरोबर त्या ठिकाणी जे कोणी इतर लोक असतील त्यांना जमीनीवर सप- शेल पालथें पडणें तत्काळ भाग पडे. मग त्यावेळी त्यांची अंगे जरी धुळीनें भरून गेली किंवा चिखलानें खराब झालीं तरी हरकत नाहीं ! जर कोणी त्यावेळी त्यांस साष्टांग नमस्कार घातला नाहीं, तर ते दोन तरवारवाले लोक बळजबरीनें त्यांना खालीं पाडित असत. ह्या लढवय्ये सामुराईशिवाय इतर लोकही त्या स्वारीत दायमियोबरोबर असत. आपापल्या हुद्याप्रमाणे ते निरनिराळी शस्त्रें आपणापाशी घेत अ सत. त्या प्रत्येकाच्या खांद्यावर दायमियोचें थोडें बहुत सामानसुमान