पान:जपानचा इतिहास.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
जपानचा इतिहास.

 जपानी विद्यार्थी हुशार, अदबशील व मेहनती असतात. पण कधीं कधीं आपल्या पंतोजीपेक्षां आपण अधिक हुशार आहों अशी त्यांना घमेंड चाटू लागते. "सर, आतां आह्माला अमेरिकन इतिहास नका शिकवूं. विमानें कशीं करितात, तें भातां आह्माला सांगा." एक युरोपियन गृहस्थ हाणतो, " अशा तऱ्हेचे प्रश्न विद्यार्थ्याकडून शिक्षकाला वरचेवर ऐकण्याचा प्रसंग येतो, "

_______
प्रकरण १३ वें.
जपानी लोकांचे वर्ग कसे आहेत ?
_______

 कांहीं अंशी आमच्याप्रमाणेच जपानी लोकांचे जातवर्ग आहेत. पण त्यांत धर्मसम्बन्ध कांहीं नाहीं, [त्यापैकीं मुख्य मुख्य येथे सांगतो.

 सामुराई – सर्वपेक्षां लष्करी लोकांचा वर्ग श्रेष्ठ प्रतीचा गणला जात असे. सामान्य लोक त्यांना साम ह्मणजे धनी - साहेब ह्या नांवानें हाक मारीत. ह्मणून त्या वर्गाला सामुराई हैं नांव पडलें, त्यांना नेहमीं बरोबर दोन तरवारी बाळगण्याचा हक्क असे, त्यांच्यावर कोणच्याही तऱ्हेचा कराचा बोजा नसे. सर्व सरकारी खात्यांत त्यांना नोकरी मिळे. त्यांच्यापैकीं कांहीं- जण लढवय्ये असून शिवाय विद्वानही असत.

 देशांतील मूळच्या लोकांना ताब्यांत ठेवण्याकरितां व परकीयांच्या होणाऱ्या स्वाऱ्यांचा प्रतीकार करण्याकरितां लढवय्ये लोकांची फार गरज पडे, त्यामुळे त्यांचें फार माजलें. निरनिराळ्या घराण्यांतील जे पुरुष त्यावेळीं शौर्य गाजवून