पान:जपानचा इतिहास.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १२ वै.

६९


विण्याकरितां अमेरिकन, इंग्लिश व जर्मन वगैरे प्रोफेसरांची नेमणूक झाली. सरकारानें हुशार हुशार विद्यार्थी विद्याभ्या. साकरितां परदेशी पाठविले. बाकीचे कांहीं धाडशी लोक, ज्यांची परदेशी विद्याभ्यासाकरितां पाठविण्यास सरकारानें निवड केली नव्हती ते, चोरून परदेशाला गेले. त्यापैकीं दोघे पुढे प्रधानाच्या पदवीला चढले.

 आतां जपानांत प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयां- तील शिक्षणापर्यंत देशांतल्या देशांत उत्तम सोय झाली आहे.

 इ. स. १८८८ सालीं शाळा व कॉलेजें मिळून संख्या २७,९२३ होती. त्यांत, ६१,२९१ पुरुषशिक्षक व ३,७४२ स्त्रीशिक्षक होते. शिकणाऱ्या मुलांची संख्या २१,६४,९६३ व मुलींची संख्या ८,८५,५७५ होती. परदेशीय शिक्षक २४७ होते. त्यांपैकी १२६ अमेरिकन व ७७ ब्रिटिश होते. शिक्षकांच्या शाळा ४७ असून त्यांत ५२३२ विद्यार्थी शिकविण्याची कला शिकत होते. विश्व- विद्यालयांत पांच शाखा आहेत. कायदा, भाषाविषय, शास्त्री- यविषय, एन्जिनियरिंग, व वैद्यशास्त्र त्यांत ७०० वर वि- द्यार्थी शिकत होते. शिवाय खासगी कॉलेजेंही मोठमोठी आहेत. १८८४ पासून शाळेच्या सामान्य शिक्षणक्रमामध्यें इंग्लिश भाषेचा समावेश झाला आहे.

 जपानांत स्त्रीशिक्षणाला चांगलें उत्तेजन आहे. हिंदुस्था नच्या लोकसंख्येच्या मानाने व जपानच्या लोकसंख्येच्या मा- नानें तुलना करून पाहिलें असतां, हिंदुस्थानांत जर शिकलेली एक स्त्री तर जपानांत शिकलेल्या २० स्त्रिया असें प्रमाण बसतें.