पान:जपानचा इतिहास.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
जपानचा इतिहास.

णाच्या योगानें मुलगे आदरशील, विद्यार्थी विनयशील व प्रजा आज्ञाधारक निपजे, लोकांना प्राचीन गोष्टींचा फार अभिमान उत्पन्न होई. व बाकी इतर गोष्टींचा विचार न करितां कान्फ्युशियस यांचींच मतें आंधळेपणानें ते खरी मानीत. परंतु त्या शिक्षणाच्या योगानें बुद्धीला चेतना काहींही मिळत नसे. 'पीछेसे आयी और आगेसे गयी ' हैं त्यांचे वर्तनतत्व ठरीव असे. त्या शिक्षणानें धार्मिक विचार कांहीं जागृत होत नसत. परंतु जातिविशिष्ट हीन विकारांना मात्र फार उत्तेजन मिळत नसे. न्यायाविषयीं आदर व प्रीति उत्पन्न होत नसे.

 कांहीं विशेष उत्सुक अशा विद्याप्रिय लोकांनीं नाकासाकी येथे राहणाऱ्या हालंडच्या लोकांपासून त्यांच्या डच भाषेत लिहिलेल्या चुकांवरून वैद्यशास्त्र व आणखी इतर कांहीं शा- स्त्रांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याकाली सर- कारचा कल परदेशी टोकांच्या विरुद्ध असल्यामुळे असले प्रयत्न करणान्या अनेक लोकांना प्राणास मुकावं लागलें.

 इ. स. १८५४ साली जपानांत राहून कांहीं विविक्षित ठिका- णी व्यापार करण्याची सरकारने परदेशीय लोकांस परवानगी दिली. त्यानंतर परदेशी लोकांची भाषा आपणास येर्णे अगत्य असें जेव्हां जपानी लोकांस वाटू लागले, तेव्हां 'रानटी लिहिण्याची परिक्षां घेण्याचें ठिकाण' असे नांव देऊन १८५६ सालीं सरकारानें परभाषांचें एक विद्यालय स्थापन केलें. कमें क्रमें- करून पुढें हेंच विश्वविद्यालय बनलें.

 १८६८ साली राजाची नाहींशी झालेली सत्ता जेव्हां पुन्हां प्रस्थापित झाली तेव्हां जपानी शिक्षणपद्धतीमध्ये मोठा थोरला फेरफार झाला. हायस्कूलांतून व कॉलेजांतून शिक-