पान:जपानचा इतिहास.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १२ वे.

६७


 ह्या वैराग्यपर कवितेचा अर्थ ती पाठ करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना बहुतकरून कळत नसतो. शाळा सुटल्याबरोबर जपानी मुलें उड्या मारून मोठ्या आनंदाने खेळू लागतात.

 पूर्वी सांगितळेंच आहे की जपानी भाषेत चिनी शब्द पुष्कळ आहेत. चिनी भाषेत वर्ण नाहींत. प्रत्येक शब्द लिहिण्याची तन्हा निराळी असते, त्यामुळे एकदम वर्ण लि. हिण्यास शिकून भागत नाही. प्रत्येक शब्द कसा लिहावयाचा ते शिकावे लागते. अगदी कमीत कमी धरले तरी सहा वर्षांत जपानी मुळे एक हजार शब्दांची पक्की ओळख करून घेतात. चलाख मुलें योग्य शिक्षकाच्या हाताखाली असली तर तीं तीन हजारंपासून चार हजारपर्यंत शब्दांची माहिती करून घेतात, व मोठ्या पंडित लोकांना दहा हजार व कधीं कधीं त्याहीपेक्षा जास्ती शब्द स्मरणांत ठेवतां येतात. सतराव्या शतकाच्या आरंभापर्यंत विद्याही फक्त बौद्धधर्मीतच वास करीत असे. देवळे ह्या शाळा व धर्मपुस्तकें हे अभ्यासाचे ग्रंथ. पुढें टोकूगावा हे घराणे सत्ताधारी झाल्यावर सर्व प्रकार पालटला. शिकलेले लोक कान्फ्यूशियस पंथी झाले; व शिक्षणक्रम प्रचारांत आला. 'पितृभक्तीचा ग्रंथ' ज्यांत त्या भक्तीची स्तुति करण्याकरितां अतिशयोक्तीच्या गोष्टी लिहिल्या आहेत, ते पुस्तक व दुसरें सामाजिक बंधनाविषयीं ज्यांत चर्चा आहे असें ‘सुवर्णमध्य' हे पुस्तक, अशी दोन पुस्तकें त्यावेळी फार वाचण्यांत येऊ लागली. एकंदरीत, कान्फ्यूशियस व मन्शियस इत्यादिकांच्या मतांचा व ग्रंथांचाच विशेष प्रसार झाला. चिनी भाषाही जपानी शिक्षणाची अथश्री व चिनी तत्वज्ञान ही इतिश्री असा प्रकार होऊन बसला. त्या शिक्ष