पान:जपानचा इतिहास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
जपानचा इतिहास.

प्रकरण १२ वें.
जपानांतील शिक्षणपद्धति.

 जपानी मुलांच्या शिक्षणास त्यांचे वयाचे सहावे वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या सहाव्या तारखेला सुरवात होते. त्या दिवशी मोठ्या समारंभानें त्यास लिहिण्याचा पहिला धडा मिळतो. एक कलमदान, त्यांत लहानशी शाईची वडी, एक कलम, शाई करण्याकरितां एका भांड्यांत थोडेसे पाणी, शाई ठेवण्यास एक लहानशी तबकडी व कांहीं कागद इतक्या सामुग्रीसह मुलगा आपल्या मास्तरापुढे जाऊन बसतो. नंतर पंतोजी त्याला कागदावर एक दोन मोठाली अक्षरें काढून देतो, व ती अक्षरें कशी काढावयाचीं त्याची समजूत तो देतो, तीं अक्षरें त्याला चांगल्या रीतीनें काढतां येऊ लागली ह्मणजे तो त्याला दुसरीं अक्षरें काढून देतो.

 त्यांच्यामध्यें इ-रो-ह नांवाचें वर्णाक्षर मालेचें एक पद्य आहे ह्मणून मार्गे सांगितलेंच आहे. तें पद्य कधीं कधीं तीं मुलें वर्गामध्ये उच्च स्वरानें ह्मणतात. ज्या पद्धतीनें ती वर्णा- 'क्षरमालिका गुंफली आहे त्या पद्धतीच्या योगानें त्या पंद्याला कांहीं एक अर्थ प्राप्त झाला आहे. तो येणेंप्रमाणे :-

 ' पुष्पांचा वर्ण मनमोहक असतो, परंतु तीं सुद्धां गळून पडतात; आणि त्याचप्रमाणें ह्या आमच्या जगांत कोण चिर- ! काल टिकणार आहे ? हा अस्तित्वरूपी निर्जन डोंगर भी आज ओलांडला व क्षणैक भी स्वप्नस्थितींत गेलों, पण त्याच्या योगानें मी धुंद मात्र झालों नाहीं. '