पान:जपानचा इतिहास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें.

६५


त्या गोष्टीचा डांगोरा सर्व गांवभर पिटवीत असत. इ. स. १८७१ ह्यावर्षी पहिलें वर्तमानपत्र निघालें. तें अगदी लहान होते. हल्लींच्या वर्तमानपत्र ह्या नांवाला तें शोभण्यासारखें नव्हते. त्याच्या पुढच्या वर्षी मि. जॉन ब्लॅक ह्या नांवाच्या गृहस्थानें एक वर्तमानपत्र काढलें. त्यांत मात्र सार्वजनिक विषयावर योग्य टीका होऊं लागली. तदनंतर वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें, एकामागून एक झपाट्याने निघू लागली. वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें, अनेक उद्देशांनी स्थापन झालेल्या ' सभांची त्रैमासिकें वगैरे मिळून इ. स. १८९८ ह्यावर्षी, ६४८ प्रसिद्ध झाली. लोकहितवादी, मुळापासून सुधा- रणा करूं इच्छिणारे, पुराणप्रिय, परदेशीयांचे द्वेष करणारे चारा येईल तशी पाठ फिरविणारे व स्वातंत्र्याभिलाषी अशा सर्व प्रकारच्या लोकांकडून आपापल्या मतांचें मंडन मोठ्या जारीनें चालविलें जातें, जपानामध्ये प्रेस आक्टाचें काय स्व- रूप आहे तें पुढें प्रसंगोपात सांगू.

 लायब्रया - टोकियो ह्मणून जी जपानची राजधानी आहे तेथील लायब्ररींत, देशामध्यें प्रसिद्ध झालेलें हरएक पुस्तक ठेवावयाचेंच असा नियम आहे. त्यामध्ये चिनी पुस्तकें मिळून एक लाख ग्रंथसंग्रह आहे. शिवाय यूरोपियन पुस्तकें पंचवीस हजार आहेत. जपानी विश्ववि- द्यालयाच्या पुस्तक संग्रहालयांत जपानी व चिनी एक लाख पुस्तकें असून शिवाय यूरोपियन पुस्तकें ऐशी हजार आहेत. ह्यापेक्षां लहान अशा निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या आठ लायब्रया आहेत.

_________