पान:जपानचा इतिहास.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
जपानचा इतिहास.

बरीची फार शिफारस झाली आहे. ह्या कादंबरीचे एंकरों सहा भाग आहेत. जपानी बुकें आपल्या इकडच्या बुकांपेक्षां लहान असतात, तरी एका ग्रंथाची एकरों सहा बुकें ह्मणजे अधीकच.

 हक्केंडेन हैं पुस्तक प्रत्येक जपान्याला फार प्यार आहे. तें एकदाच वाचून त्याचें समाधान होत नाहीं. त्या पुस्तकामध्ये आठ मुख्य प्रकारच्या सद्गुणांना आठ सरदार बनवून त्यांच्या- कडून अशक्य अशीं अनेक कामें करविली आहेत. हैं पुस्तक यूरोपियन लोकांना फारसें आवडत नाहीं.

 जपानचा अन्य देशाशीं व्यवहार होऊं लागल्यापासून जपानी वाङ्मयांत मोठा फेरफार होऊन गेला आहे. दरवर्षी हजारों बुकें व चोपडी छापखान्यांतून छापून निघतात. परंतु त्यांपैकी पुष्कळ युरोपियन ग्रंथांची भाषांतरे असतात, किंवा युरोपियन नमुन्यावर लिहिलेली असतात. स्माइल्स साहेबांच्या सेल्फ हेल्प, नामक ग्रंथाचें जपानी भाषेत झालेलें भाषांतर त्या लोकांना फार प्रिय आहे. अलीकडे जपानांत एक कादं- बरी प्रसिद्ध झाली आहे. त्या कादंबरीतील नायक प्रीस देशां- तील स्वातंत्र्यप्रिय व स्वदेशभक्त योद्धा जो 'इपामिनांडास ' तो आहे. हे पुस्तक त्या लोकांना इतके आवडलें आहे व हैं लिहून त्या कादंबरीकाराला इतकें द्रव्य मिळालें आहे कीं त्या द्रव्याच्या योगानें त्यानें सर्व यूरोपभर प्रवास केला व आतां आपल्याकरिता एक सुंदरसें घर बांधून तो राहिला आहे.

 वर्तमानपत्रे - अगदी परवांपर्यंत जपानांत वर्तमानपत्रे नव्हती. कोठें कांहीं भयंकर रीतीनें खून झाला किंवा कांहीं आश्चर्यजनक वर्तमान घडून आलें झणजे तराळाकडून तोंडीच