पान:जपानचा इतिहास.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वे.

६३


होटोटो गिसु,
नकीटसूर कट वो,
नगमूरेब-,
तड अरि आके नो,
त्सुक झोनोकोरेरू.

 भावार्थ - " ज्या ठिकाणीं कोकिल पक्ष्याचे गायन मला ऐकू येत होतें, त्या ठिकाणीं मी टक लावून पाहूं लागलों तों तेथें सुप्रभातीच्या चंद्राशिवाय दुसरें कांही नव्हते."

 जपानी कवितेंत अनुप्रास नाहींत. एखाद्या ठिकाणीं ते दृष्टोत्पत्तीस आले, तरी ते उद्देशपूर्वक योजले आहेत असें समजावयाचें नाहीं.

 'पुष्पें, पक्षी, बर्फ, चंद्र, पावसाळ्यांत गळून पडणारीं पानें, प्रीती-हीं तर कोठेही असावयाचींच-व आयुष्याची क्षणभंगुरता है जपानी सारस्वताचे विषय आहेत.'

 अद्भुत कथानकांची जपानी ग्रंथसमूहांत रेलचेल आहे. त्यापैकी कांहीं कथानकांत दहाव्या व अकराव्या शतकांतील जपानच्या दरबारांतील अंतःस्थितीचे फार मनोहर वर्णन केलें आहे. हीं कथानकें बहुतेक स्त्रियांनींच लिहिली आहेत. झणून त्यांमधून केव्हां केव्हां त्या काळच्या पोषाकाचें व मनो- रंजनाच्या अनेक साधनांचे फार बारीक रीतीनें वर्णन केलेले आढळतें.

 कादंबऱ्या हा एक लोकप्रिय विषय आहे. इ. स. १८४८ मध्ये मरण पावलेला बेकिन नांवाचा कादंबरीकार आलीक- फेडच्या कादंबरीकारांत नांवाजलेला आहे. त्याने २०० ग्रंथ लिहिले. त्यापैकी 'हक्छेंडेन' आठ कुत्र्यांची गोष्ट ह्या कादं-