पान:जपानचा इतिहास.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
जपानचा इतिहास.

वर्षी लिहिला गेला. हा पौराणिक धर्तीवरचा इतिहास आहे. ह्यांत जपानचा प्राचीन इतिहास वर्णिलेला आहे. ह्या ग्रंथानंतर दुसरा 'निहोंगी' - जपानची बखर - ह्या नांवाचा एक ग्रंथ चिनी भाषेत लिहिला गेला. 'मनयोशु ' - असंख्य पर्णांचा समुदाय-हा ग्रंथ इ. स. ७६० च्या सुमारास लिहिला गेला. ह्यामध्ये अतिप्राचीन काळच्या कवितांचा संग्रह आहे. ह्या संग्रहावरून जपानच्या पूर्वकालीन स्थितीचा बोध होण्यास पुष्कळ मदत होते. त्या काळापासून चिनी व जपानी, दोन्हीं भाषेत मोठ्या झपाट्यानें ग्रंथ निर्माण होत आहेत. कादंबऱ्या, नाटके व काव्यें वगैरे विषयांचे ग्रंथ जपानी भाषेत लिहिले जातात. व इतिहास, कायदा वगैरे मननपूर्वक वाचण्याचे ग्रंथ चिनी भाषेत लिहीत आहेत.

 पूर्वी सांगितलेल्या दोन ऐतिहासिक ग्रंथांखेरीज 'दाई- निहोन्शी' ह्या नांवाचा एक ऐतिहासिक ग्रंथ फार महत्वाचा आहे. ह्या अजस्र ग्रंथाचीं शंभर निरनिराळीं बुके आहेत. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी कांहीं चिनी व कांहीं जपानी विद्वा- नांनी मिळून हा ग्रंथ लिहिला आहे.

 जपानी कवितेत पहिले व तिसरे चरण पांच पांच अव- यवांचे व दुसरे आणि चवथे चरण सात सात अवयवांचे असतात; व शेवटीं सात अवयवांचा पुन्हां एक चरण असतो. केव्हां केव्हां एकेक जपानी कविता पानपान अर्धअर्ध पान : विस्तृत असते. परंतु प्रायः प्रत्येक कविता : ३१ अवयवांची अशी लहानच असते. खालीं जपानी कवितेचा एक नमुना दिला आहे:-