पान:जपानचा इतिहास.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वै.

ह्या मुळाक्षरांच्या बाराखड्या आमच्या बाराखड्यांप्रमाणेंच लिहितात.

 दुसरी ' हिरगन ' नांवाची लेखनपद्धति. ही पद्धति इंग्लिश भाषेत प्रचारांत असलेल्या रोमन लेखनपद्धतीच्या नमुन्यावर आहे. ' हिर' शब्देकरून 'सपाट, गुळगुळीत ' असा अर्थबोध होतो.

 ज्या ठिकाणी आमच्या पुस्तकांची इतिश्री असावयाची. त्या ठिकाणीं जपानी पुस्तकांची अथश्री असते. त्यांच्या ओळी उभ्या असतात. पहिली ओळ उजवीकडून सुरू होते. पुस्तकें जीं लिहिलेली असतात, तीं बहुतकरून चिनी लिपी व दोन ' कन ' लिपींपैकी एकादी लिपी अशा मिश्र लिपींत लिहिलेलीं असतात. नामे व क्रियापदें यांचे मूळरूप लिहि- ण्याकडे चिनी लिपीचा उपयोग करितात. प्रत्यय आणि उपपदे लिहिण्याकडे ' कन' लिपीचा उपयोग करितात. प्रत्येक चिनी अक्षराचा निरनिराळा उच्चार होतो. प्रत्येक शब्दावयवांची निरनिराळी रूपे असतात. विरामचिन्हें किंवा वाक्यपूर्णता दाखविणारी दुसरी कोणती चिन्हें नाहींत. सग- ळ्या शब्दांची एकच गोळाबेरीज, असा प्रकार असल्यामुळे लेखनपद्धति फार त्रासदायक व गुंतागुंतीची झाली आहे. ही स्थिति नाहींशी करून युरोपियन लिपी प्रचारांत आण- ण्याची खटपट करण्याकरितां एक सभा स्थापन झाली आहे.

 वाङ्मय - इ. स. च्या सातव्या शतकामध्ये जपानी भा- बेंत एक दोन ग्रंथ निर्माण झाल्याचे ऐकिवात आहे. परंतु ते हल्ली अस्तित्वांत नाहीत. हल्लींचा अति प्राचीन ग्रंथ झटला ह्मणजे कोजिकी ह्या नांवाचा. हा ग्रंथ इ. स. ७१२ ह्या