पान:जपानचा इतिहास.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
जपानचा इतिहास.

पुष्कळांचे उच्चारांत फार फरक पडला आहे. त्यामुळे एखाद्या जपान्याची व एखाद्या चिनीची गांठ पडली तर त्यांना भाष- णाचे योगानें एकमेकांना आपले मनोदय कळवितां येत नाहींत परंतु लिहून कळवितां येतात.

 जपानी लोकांना मुळारंभी लिपी ठाऊक नव्हती. इतर सुधारणेबरोबरच चीन व कोरीया ह्या दोन देशांत प्रचलित असलेली लिपी त्यांनी चालविली. इ. स. ४०० च्या सुमा- रास जपानी लोक लिहिण्याची कला शिकले असें ह्मणतात. परंतु त्या काळचा इतिहास असावा तितका विश्वसनीय नाहीं, त्यामुळे खात्रीनें कांही सांगवत नाहीं.

 आठव्या व नवव्या शतकाच्या अदमासाला कन नांयाची दुसरी एक लेखनपद्धती अमलांत आली. ह्या कन लिपीमध्ये दोन भेद आहेत. एकाला 'कटकन ' अशी संज्ञा आहे. 'कट' ह्मणजे ' जोडीपैकीं एक करि ' ह्मणजे उसनवार घेणें ' ' न'=' नाम. ' हा त्या संपूर्ण शब्दाचा धात्वर्थ. ' चिनी शब्दाच्या अर्ध भागापासून उसनवार घेता लेले शब्दावयव.' असा त्याचा स्पष्टार्थ. चीन देशांत पुष्कळ वर्षे राहिलेल्या रिबो माबी नांवाच्या एका गृहस्थानें ही लिपी प्रचारांत आणली असें ह्मणतात. त्यानंतर कोबो दायशी नावाचा एक बौद्ध जति चीन देशामध्ये एकोणीस वर्षे राहिला होता. ह्याला संस्कृत व पाली ह्या दोन्ही भाषा येत होत्या- त्याने 'कटकन' लेखनपद्धतीतील ४७ अवयवांच्या धुळा- क्षरांची एक कविता रचिली. त्यांतील पहिल्या तीन शब्दाव- वरून त्या कवितेस 'इ-रो-ह' हें नांव पडलें आहे.