पान:जपानचा इतिहास.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें.

५९

-→→
जपानी लोकांची भाषा व वाङ्मय.

 आमच्या हिंदुस्थानांत ज्या अनेक भाषा चालतात, त्यांत मुख्य दोन भेद आहेत. जिचा प्रचार उत्तरेकडे फारकरून आहे ती आर्यभाषा व जिचा प्रचार दक्षिणेकडे विशेष आहे, ती द्राविडी भाषा. पहिलीचा धर्म असा आहे कीं, तिच्या शब्दांत असलेले सर्व अवयव एक जिवाचे असल्याप्रमाणें दिसतात. व दुसरीचे प्रत्यय वगैरे तिला चिकटविल्याप्रमाणें दिसतात. जपानी भाषा ह्या दुसऱ्या भाषेत मोडते. जपानी भा- षेंत क्रियापद कर्माच्या नंतर व वाक्याच्या शेवटीं येतें. जपानी भाषेत नामाला लिंगभेदानें किंवा संख्याभेदानें कोणताही संस्कार होत नाहीं. एखाद्या नामाचें स्त्रीलिंगीं जें तेंच पुल्लिंगी घ तेंच नपुंसकलिंगी. एकवचनीं जें रूप तेंच द्विवचन अनेकवचनी. त्याचप्रमाणे जपानी भाषेत क्रियापदांची प्रथम द्वितीय व तृतीय पुरुषों एकच रूपें असतात. बहुतेक सर्व शब्द स्वरान्त किंवा नकारान्त असतात. ज्याप्रमाणें आमची मराठी भाषा संस्कृत व प्राकृत ह्या दोन भाषांपासून झाली आहे, त्याप्रमाणे जपानी भाषा, पूर्वकाळच्या जपानीपासून व चिमी भाषेपासून हल्लींचें रूप पावली आहे. बोळण्यामध्ये ह्या दोन भाषा जरी एकरूप पावल्या आहेत, तरी लिहिण्यामध्यें त्या आपलें भिनत्व राखून आहेत, आह्मी ज्याप्रमाणें कांहीं नवीन शब्दाची गरज लागली ह्मणजे तो संस्कृत भाषेतून घेतों, त्याप्रमाणे ते लोक चिनी भाषेतून घेतात.

 चिनी भाषेतून जपानी भाषेत आलेल्या बहुतेक शब्दांच मूळची रूपें जरी कायम राहिली आहेत, तरी त्यांच्यापैकी