पान:जपानचा इतिहास.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
जपानचा इतिहास.

एकसारखी टक्कर देत असतो, त्याप्रमाणें हा एक टणक पोरगा कितीही संकटे आली तरी तितक्यांना टक्कर देऊन कीर्ति व संपदा यांना आपल्याशा करील.

 पत्ते, भोवरे, बुद्धिबळें वगैरे मुलांचे करमणुकीचे खेळ आहेत. परंतु पतंग खेळण्याची जपानी मुलांना जितकी लज्जत व जितकी हौस आहे, तितकी दुसऱ्या कोणत्याही खेळामध्यें नसेल. जपानी पतंग चिवट कागद बांबूच्या काट- क्यांना चिकटवून केलेले असतात. कांहींच्या आकृति थो-माणसाप्रमाणे, कांहींच्या मुलाप्रमाणें व कांहींच्या नानातऱ्हेच्या पक्ष्यांप्रमाणें व जनावरांप्रमाणे आणि कांहींच्या अनेक त-हे- च्या पंख्यांप्रमाणे असतात. केव्हां केव्हां चौकोनी पतंगावर पौराणीक योध्यांचीं, खुबसुरत स्त्रियांची, नानाप्रकारच्या राक्ष- सादिकांची चित्रे रंगविलेली असतात. कधीं चिनी अक्षरें मोठमोठाली काढतात. कांहीं कांहीं पतंग औरस चौरस सहा फुट असतात. मुर्ले केव्हां केव्हां आपल्या पतंगानें दुसऱ्याचा पतंग खाली आणण्याचा प्रयत्न करितात. ह्याकरितां ते आपल्या पतंगाजवळच्या सड्याच्या कांहीं भागाला डिंक लावून त्यावर कांचेचा चूर चिकटवितात. त्या योगानें दुस- =याच्या पतंगाची दोरी, झटकन कापता येते. हा एकमेकांचे पतंग तोडून पाडण्याचा खेळ मोठा मौजेचा होतो.