पान:जपानचा इतिहास.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १० वै.

५७


आपल्याबरोबर वनभोजनाला घेऊन जातात. ते त्यांना जत्रेला नेतात. मुलांशिवाय त्यांना कोठेही चैन पडत नाहीं. त्यांची मुलेंहीं तशींच दिसण्यामध्यें व वागणुकीमध्ये स्नेह उत्पन्न करणारी दिसतात. ती फार नम्र व मनमिळाऊ असतात. ती आपल्या आईबापांच्या उपयोगी पडण्याविषयीं फार तत्पर असतात; व आपल्या सोबत्यांशी मिळून मिसळून असतात. पण त्यांना मुलें ह्मणण्यांपेक्षां छोटे पुरुष व छोट्या बायका लटलेलें अधिक शोभेल. त्यांची मुद्रा गंभीर असते, व त्यांचा पोषाख थोरांच्या पोषाखासारखाच असल्यामुळे ती विशेषच थोर माणसांशी साम्यता दर्शवितात. "

 तिसऱ्या महिन्याच्या तिसऱ्या तारखेला मुलींचा एक मोठा सण असतो. ह्या सणाचें नांव " बाहुल्यांची मेजवानी' असें आहे. हा सण जसजसा जवळ येईल तसतशी शहरांतील दुकानें बादशहा व सरदार इत्यादिकांच्या सुंदर व सुशोभित चित्रांनीं, स्त्रियांना अवश्य लागणाऱ्या पदार्थांनी गजबजून फुलून जातात.

 मुलांचा सण पांचव्या महिन्याच्या पांचव्या तारखेला असतो. ह्या सणास 'रणेश्वराची मेजवानी' असें ह्मणतात. त्यावेळीं दुकानदार दुकानांत विकण्याकरितां जीं चित्रें मांडून घेऊन बसतात, तीं मोठमोठ्या नामांकित योध्यांची व लढाईत लागणाऱ्या नानाप्रकारच्या हत्यारांचीं वगैरे असतात. त्या वर्षी घरांत जर एखादा मुलगा जन्मास आलेला असला तर त्या दिवशी एका काठीवर एक कागदाचा केलेला मासा पताकेप्रमाणें फडकवीत सोडतात; व त्यानें असें सुच- वितात कीं, नदींत ज्याप्रमाणे पाण्याच्या झोताविरुद्ध मासा