पान:जपानचा इतिहास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
जपानचा इतिहास.

स्वराज्य आहे, पण आमचें स्वराज्य नाहीं. त्यामुळे हा अमो- लिक पदार्थ आह्मी आपणास दुर्मिळ करून घेतला ह्मणजे आपले हाल कुत्रासुद्धां खाणार नाहीं.

 मुलगा सोळा वर्षांचा झाला ह्मणजे तो वयांत आला असें समजतात. व तेव्हांपासून तो आपले नांव बदलतो. आपले केस थोर मनुष्याप्रमाणें राखूं लागतो, व त्याला लग्न करण्याला अधिकार प्राप्त होतो.

 आईबापांचा सन्मान राखर्णे मुलाचे आद्य कर्तव्यकर्म आहे असें समजतात. प्रख्यात लोकांच्या लिहिण्यामध्यें व प्रचारां- तील हाणीमध्ये ही प्रवृत्ति स्पष्ट दिसून येते. कनिष्ट प्रतीच्या प्राण्यांचे उदाहरण दाखवून मुलांच्या मनांत ही गोष्ट बिंब. वून देतात.", कोकरूंसुद्धां आपल्या आईचें दूध पिते- वेळी गुढगे टेकतें" "कावळासुद्धां आपल्या आईबापाच्या उपका- रांची फेड करितो " जपानी लोकांमध्ये पूर्वी असा कायदा होता कीं, आपला बाप किंवा आई, अगर आजा किंवा आजी, ह्यां- पैकी कोणी मेलें असून त्यांच्या सुतकाचे दिवस असतां जो कोणी मुलगा आपण लग्न करील त्याला १०० दिवस कैदेत ठेवावें. आणि त्यानें जर मुळींच सुतक पाळले नसलें तर एक वर्षपर्यंत त्याची सुटका करूं नये.

 मुलांच्या करमणुकी-जपान देशाला मुलांचें नंद- नवन असें ह्मणण्याचा प्रघात पडला आहे. एक प्रवाशी स्त्री ह्मणते-की " जपानी लोकांइतके शिशुप्रिय लोक मी कोठेंच पाहिले नाहींत. ते आपल्या मुलांचे फार कौतुक करितात. तो त्यांना आपल्या हातांत वरून फिरतात. ते त्यांचे खेळ मोठ्या कौतुकानें पाहत बसतात. ते त्यांच्या खेळांत मिसळतात. त्यांना