पान:जपानचा इतिहास.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १० वै.

५५


 सर्व जपानी लोकांचे गुढगे बहुतेक आंत वांक आल्या- प्रमाणें दिसतात. ह्याचें कारण लहानपणी त्यांना पाठकुळीवर बांधण्याची त्या लोकांमध्ये जी चाल पडून गेली आहे, तेंच होय. ह्या त्यांच्या पाठकुळीवर बांधण्याच्या रीतीनें मुळांचे गुढगे एकमेकांना चिकटून त्यांचे पाय बाहेर आलेले अस- तात, व कोवळ्या वयांत एकदां जें वळण पायांना पडलेलें असतें तेंच पुढे मोठेपणीं कायम राहते; व जपानी मनुष्याचे गुढगे आंत वांकल्याप्रमाणें दिसतात.

 आपली मुलें दोनदोन, चारचार, पांचपांच, वर्षांचीं होईपर्यंत त्यांना पाजून जपानी स्त्रिया आपल्या शरीराचे फार मातेरें करून घेतात. लहानगा मुलगा आपल्या सोब- त्यामध्ये खेळतां खेळता एकाएकीं आपल्या आईकडे जाईल व गुढगे टेकून अगर उभ्यानेंच आपल्या आईच्या स्तनांतले चार घोट घटुंटुं प्राशन करून पुन्हां परत येऊन खेळा- वयाला लागेल. जपान देशामध्यें गाईचें दूध काढीत नाहींत.पूर्वी सांगितलेच आहे. गाईच्या दुधासारखा मुलांना फार हिताचा व केवळ आवश्यक पदार्थ जपानी लोकांना ठाऊक नसल्यामुळे ही फार दिवस मूल अंगावर पाजण्याची व त्या- योगाने स्त्रियांना अकाली निस्सत्व करून टाकण्याची चाल जपान देशांत पडली आहे. ह्या गोष्टीची सुधारणा जपानी लोकांनीं अगदीं प्रथमारंभीं केली पाहिजे; व गाईचें दूध 'नसेल तर किती हानी होते, हें लक्ष्यांत आणून आमच्या लोकांनी येव्हांपासून उत्तम सोरट्या गाईंची पैदास जी लोपून जाण्याचा रंग दिसत आहे ती राखण्याकडे आपल्या एकंदर बुद्धीचा, कालाचा व श्रमाचा व्यय केला पाहिजे, जपानी लोकांचे