पान:जपानचा इतिहास.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
जपानचा इतिहास.

आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन येऊ लागले आहेत. जपानी स्त्रियांचें मोहक सौंदर्य व मर्यादशील वर्तन पाहून यूरोपियन लोकांना कौतुकाश्चर्य वाटतें.

_______
प्रकरण १० वें.
_______
जपानी लोकांची मुलें.

 जपानी लोक मुलांचें नांव उपजल्यापासून सातव्या दिवशी ठेवतात. जपानी उपनांचे नद्या, डोंगर, गांव ह्यांच्या नांवावरून घेतलेलीं असतात. स्त्रियांची नांवें फुर्ले वगैरे' मोहक सृष्ट पदार्थीच्या नांवावरून ठेवलेली असतात. मूळ महिन्याचें झालें ह्मणजे त्याचें डोकें भादरतात. नंतर त्याला स्वच्छ स्नान घालून व त्याच्या अंगावर कपडे सुंदर चढवून त्याची आई त्याला आपल्या कुलस्वामीच्या देवळाकडे घेऊन जाते. तेथें देवाची पूजा अर्चा करून ती आपल्या मुळाला त्याच्या पायांवर ठेवून त्याची प्रार्थना करिते, नंतर आपलें मूल घेऊन ती आपल्या जवळच्या जवळच्या आप्त इष्टमि- त्रांच्या घरी भेटावयाला जाते. त्या ठिकाणी ते तिला आपा-' पल्या शक्तीप्रमाणें व अगत्याप्रमाणे निरनिराळ्या देणग्या देतात. मूल चार महिन्याचें झालें ह्मणजे त्याच्या अंगावर थोर माणसाप्रमाणे पोषाख घालूं लागतात. ह्या पोपाखावर दीर्घायुदर्शक अशी बगळ्यांचीं व कासवांची चित्रे काढलेली असतात. अकराव्या महिन्यांत पुन्हां आणखी एक समारंभ होतो. त्या वेळेपासून मुलांच्या डोक्यावर कांहीं विविक्षित जागी केस राखूं लागतात.