पान:जपानचा इतिहास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वे.

५३


 कमी दर्ज्याच्या जपानी लोकांमध्ये काडीमोड फार होतात. श्रेष्ट दर्ज्याच्या लोकांमध्ये कमी होतात. इ. स. १८८८ ह्या वर्षों तीन लग्नास एक काडीमोड असे प्रमाण होतें.

 जपानी लोकांमध्यें स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षां कमी आहे असें मानण्याची चाल आहे. लहानपणी आईबापांच्या, थोर पणी नवयाच्या, व हातारपणीं मुलाच्या आज्ञेत प्रत्येक नि वागावें, तिला स्वतंत्रता देणे योग्य नाहीं, वगैरे आमच्या प्राचीन समजुतीप्रमाणे जपानी लोकांमध्येही ह्या समजूती दृढ होत्या. परंतु जपानी लोक पाश्चात्य राष्ट्रांशीं दळणवळण ठेवू लागल्यापासून, त्यांच्या चालीरीती व त्यांची गृहस्थिति जपानी लोकांच्या अवलोकनांत येऊं लागल्यापासून व जपानी लोक आपली मुले पाश्चात्य विद्यालयांत पाठवू लागल्यापासून त्यांचे स्त्रियासंबंधाचे कोते विचार बऱ्याच अंशाने कमी होऊं लागले आहेत. काडी मोडून मागण्याचा अधिकार आजपर्यंत नव- न्यासच असे. नवन्याच्या अंगी कोणताही दुर्गुण असला तरी त्याच्यापासून काडी मोडून मागण्याचा अधिकार बायकोला प्राप्त होत नसे. आमरणान्त, तिनें पतिशुश्रूषेत दिवस घालविलेच पाहिजेत व कसलेही हाल सोसले पाहिजेत. त्याशिवाय गत्यं- तर नसे. परंतु इ. स. १८७३ पासून हा अधिकार काय- द्याने बायकोला प्राप्त झाला आहे. इ. स. १८७१ साली पास झालेल्या कायद्यापासून स्त्रीपुरुषांना लग्नाच्या काम विशेष स्वतंत्रता मिळाली आहे. प्रधान वगैरे मोठमोठे अधि- कारीसुद्धां आलीकडे यूरोपियन लोकांच्या समाजांतसुद्धां