पान:जपानचा इतिहास.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
जपानचा इतिहास.

ते तीन पले नुसते तोंडाला लावावयाचे असें झटलें असतां अधिक शोभेल. हा एक विधी झाला. दुसरा एक विधी लग्न- संस्कारांपैकी असा असतो कीं, दारू घेऊन झाल्यावर लगेच नवरीने एका खोलीत जावें व आपल्या अंगावरचा पहिला पोषाख टाकून दुसरा रंगीत पोषाख घालावा, आणि नवयानें एका दुसऱ्या खोलीत जाऊन त्याचप्रमाणे करावें. मेजवानीचा समारंभ उरकला ह्मणजे मध्यस्थ व त्याची बायको दोघेजण नवरा नवरीला एका खोलींत घेऊन जातात, व त्याठिकाणी पुन्हां नऊ वेळां दारू पिण्याचा समारंभ होतो. ह्या प्रसंगी घरचा मालक व यजमान ह्या नात्याने पहिल्याप्रथम पिण्याचा मान नवण्याकडे येतो. पूर्वीच्या प्रसंगी नवरीचें नातें पाहु. याचें असतें हाणून तिला प्रथम मद्य देण्यांत येऊन तिचा सत्कार राखला जातो. इतकें झाल्यानंतर लग्नविधि झाला. लग्न झाल्याची वद सरकारी कामदारांना देण्यांत येते.

 ज्याला स्वतःला मुलगा नाहीं ते आपल्या जावयाला दत्तक घेतात. दत्तविधान झाल्यानंतर जांवई आपले स्वतःचें आडनांव टाकून देऊन आपल्या बायकोचें आडनांव आपणास घेतो. आपल्याला जांवई नसेल तर आपल्या वतनदारी जमिनी राखण्याकरितां अथवा आपल्यामार्गे धर्मसंबंधी कृत्ये करण्या- करितां दुसऱ्या कोणत्याही मुलाला दत्तक घेण्याचा अधिकार प्रत्येक जपान्याला आहे. ह्या दत्तकाच्या पद्धतीमुळेंच उपा विषयों जपानी लोकांना येवढा अभिमान आहे तो त्यांचा राजवंश अखंडित चाळत आल्याप्रमाणे दिसतो.