पान:जपानचा इतिहास.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वै.

५१


दर्शन' असें ह्मणतात, नवरीच्या घरावर नवरा झाडाचे टाळे नेऊन बांधतो. मुलीस तो नवरा कबूल असल्यास ती आपले दांत काळे करत्ये, 'अन्योन्यदर्शनाचे' वेळीं त्या दोघांपैकीं ए- कानें जर दुसऱ्याविषयीं आपली नापसंती दर्शविली तर मग लग्न मोडतें. पण असे फारकरून होत नाहीं. बहुतेक मुलें आपल्या आईबापांच्या इच्छेनुरूपच वागतात. विशेषतः ह्या कामी मुलींचा कधीं हट्ट असत नाहीं.

 दोघांनीही जर एकमेकांविषयीं पसंती दर्शविली तर एकमेक एकमेकांना आहेर करितात. ह्मणजे वानिश्रय झालाच. हा निश्चय झाल्यानंतर मग जर लग्न मोडूं ह्मणेल तर तें चालत नाही. नंतर मग एक शुभ दिवस लग्न लावण्याकरितां हुडकून काढतात. जपानी लोकांमध्यें शुभ्र वस्त्र परिधान करणें हे अशौचदर्शक चिन्ह समजतात. मुलीचें लग्न झालें ह्मणजे ती आपल्या आईबापांना अंतरली (मेली), त्याचप्रमाणे, तिचे आईबाप तिला अंतरले व आपल्या नवऱ्याच्या घरांतून ती या- 'पुढे मेल्याशिवाय बाहेर व्हावयाची नाहीं, हें सुचविण्याकरितां लग्नाच्या दिवशी तिला शुभ्र पोषाख घातलेला असतो. रात्र पडली ह्मणजे मग तो मध्यस्थ व त्याची बायको दोघे मिळून तिला तिच्या नव-याच्या घरी नेतात. एकादें प्रेत घराच्या बाहेर गेल्याप्रमाणें तिचे आईबाप ती बाहेर पडली ह्मणजे आपले घर झाडूनलोटून वगैरे शुद्ध करितात.

 नंतर नवऱ्याच्या घरीं मेजवानीचा थाट होतो. त्यावेळी लग्नापैकीं एक विधि व्हावयाचा असतो तो हा कीं: दारूचे तीन पेले असतात, त्यापैकी प्रत्येक पेल्यांतील मद्य नवन्यानें व नवरीनें तीन तीन वेळा प्यावयाचें. प्यावयाचें हाणण्यापेक्षां