पान:जपानचा इतिहास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
जपानचा इतिहास.

पुरतें खातात. भात हेंच शहरांतील लोकांचें मुख्य अन्न असतें. खेड्यापाड्यांतील लोक गहू, जवस व विशेषतः बाजरी खातात. भात ह्मणजे त्यांना सणावाराच्या दिवशींचें पक्वान्न. जे कोणी आजारी असतील किंवा वार्धक्यामुळे अशक्त झाले असतील तेच फक्त दररोज भात खातात. पण शेतकरी लोक जरी आपण भात खात नाहींत, तरी दुसऱ्या लोकांक- रितां तो उत्पन्न करण्यांतच त्यांच्या आयुष्याचा बराच भाग | खर्च होतो. बटाटे, वाटाणे ह्यांची लागवड जपानांत बरीच होते. घेवड्याचीही उत्पत्ति चांगली असते. जपानी लोकांचे आवडते जिन्नस हाटले ह्मणजे वांगी व मुळे; प्रत्येक जपान्याच्या प्रत्येक जेवणाचे वेळी ह्या दोन पदार्थांचीं लोणचीं असावयाचींच.

 पर्सिमन नांवाचें नारिंगाच्या रंगाचें एक फळ जपानांत विपुल असतें. त्याचप्रमाणें खुद्द दक्षिणेकडे मांदारिंग जातीचीं नारिंगेंही मिळतात, सीताफळें, द्राक्षे, वगैरे त्या देशांत आहेत पण ती हलक्या प्रतीचीं.

 इतर मांगोलियन जातींप्रमाणे जपानी लोक गाईचें दूध काढित नाहींत. तें सर्व वासराला पाजतात. त्यामुळे जपानांत लोणी, चक्का, दहीं, वगैरे दुर्मिळ आहे. जपानी लोकांना समुद्रापासून अन्नाचा पुरवठा फार होतो. मागे एकवार सांग- प्यांत आलेंच आहे, कीं ते लोक समुद्रांतून निघणाऱ्या कोणत्याही प्राण्याला भक्षण केल्यावांचून ठेवीत नाहींत. ते लोक माकडेंसुद्धां खातात.

 जेवणाचे वेळीं प्रत्येक जपान्यापुढें निराळ्या टेबलावर किंवा तिवईवर त्याच्याकरितां एका ताटांत निराळें अन्न