पान:जपानचा इतिहास.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें.

४७

जपानी लोक अन कोणच्या प्रकारचे खातात ?

 जपानी लोक खाण्यापिण्यामध्ये फार नेमस्त असतात. जपानामध्ये बौद्धधर्माचा प्रवेश होण्यापूर्वी मासे, रानटी जनाव- रांचे मांस, कंद, मुळे, फळें वगैरे प्रकारचें अन्न ते लोक खात असत. नंतर मासाचा खाण्याकडे फार थोडा उपयोग होऊं लागला. व ते लोक उद्भिज पदार्थ उत्पन्न करण्याकडे फार श्रम करूं लागले. मासे खाणें ह्मणजे हिंसा होते. व 'अहिंसा परमो धर्मः' हें तर बौद्धधर्माचें तत्व. परंतु जपानामध्यें बौद्ध- धर्माने मासे खाण्यापुरती सवलत दिली आहे. अलीकडे कांहीं घरांवर ' पर्वतमत्स्य ? 'अशा पाट्या लावलेल्या असतात. त्याचा अर्थ असा कीं, त्या घरांत हरणाचें मांस विक्रीस तयार आहे. ही निवळ फसवणूक आहे हाणावयाला कांहीं चिंता नाहीं. बौद्धधर्मानं मासे खाण्यापुरती परवानगी दिल्या. बरोबर इतर ज्या पशूंचें मांस आपणांस खावयाचें त्यासही ज्याविषयीं आपणांस परवानगी मिळाली आहे, तें मत्स्याचे नांव दिल्यानें, आपण हिंसेच्या दोषांतून मुक्त होतों अशी वेडी समजूत फक्त जपान्यांतच आहे, असें नाहीं. ती इतर लोकांतही कमी अधिक प्रमाणानेंच दृग्गोचर होते. 'पाणभाजी' अशी संज्ञा देऊन व मनांतली शंका घालवून मासे खाण्याला उक् होणाऱ्या कांहीं जाती हिंदुलोकांमध्येही आहेत, हें थोड्या शोधाअंती कोणालाही कळून येणार आहे.

 इतर पुष्कळ राष्ट्रांतील लोकांप्रमाणे जपानी लोक तीनदां भोजन करितात, तथापि त्यांची सकाळची न्याहारी थोडी हलकी असते. ह्मणजे त्यावेळी अन्न थोर्डे चालगरजी-