पान:जपानचा इतिहास.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वै.

४९


ठेवलें असतें. सतरंजीवर गुढगे टेकून आमटी, सार, वगैरे पातळ पदार्थ तो पुढें वांकून पितो. व घट्ट पदार्थ चिमट्यानें उचलून तोंडांत टाकतो. जेवणाचे वेळीं जपानी बहुतकरून चहा घेण्यास विसरत नाहींच ताटांतील सरल्यावर आणखी लागल्यास वाढण्याकरितां भाताच्या तपेल्याशी एकादी मोलकरीण हुकमाची वाट पहात गुढघे टेकून बसलेली असते. चहा घ्यावयाचा तो जेवणाच्या अखेरीस सौम्य केलेला हिरवा चहा घेतात. यात्रेच्या वगैरे प्रसंगों जपानी लोक साकी नांवाची दारू पितात. घरच्या बायका निराळ्या ठिकाणी व पुरुष निराळ्या ठिकाणीं जेवतात.

 पूर्वी सांगितलेच आहे कीं, जपानामध्ये तंबाकूचा प्रवेश पोर्तुगीज लोकांनी इ. स. १६०० च्या सुमारास केला. प्रथमतः तंबाकूचा कोणत्याही तन्हेनें उपयोग करण्याची सक्त मनाई असे. परंतु इ. स. १६५१ ह्या सालापासून सरकारनें फक्त घराच्या बाहेर तंबाकू ओढण्याची कायद्यानें परवानगी दिली. आतां तंबाकू ओढण्याचें व्यसन सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या चिलिमी लहान असतात. व त्या मध्ये बांबूच्या असून दोन्ही टोकाला पितळेच्या किंवा रुप्याच्या असतात. जपानी लोक तंबाकूचा धूर गिळून मग तो पुन्हां नाकानें बाहेर सोडतात. ह्मणून ते 'तंबाकू पिणें' असें ह्मणतात. चिलीम " व तंबाकू हाणजे अगदीं जपान्याच्या जिवाचे सोबती. को- नाही पाहुण्याला घरी बोलावले असलें ह्मणजे पहिल्या प्रथम आधीं त्याच्यापुढे चिलीम व अग्निकुंड करावयाचें, आणि नंतर एक पेलाभर चहा द्यावयाचा.