पान:जपानचा इतिहास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वें

४५


विस्तवाभोवती येऊन बसतात. चिनी मातीची भांडी, उत्तम रंगविलेले पडदे, वगैरे पदार्थ घरामध्यें शोभेकरितां ठेवितात.

 रात्रीच्या वेळी घरांत मेणबत्त्यांचा अगर तेलांच्या दिव्यांचाही उपयोग करितात, ज्या ठिकाणीं निजावयाचें त्या ठिकाणीं एक कागदाचा कंदील आंत तेलाचा दिवा शांतपणे जळत आहे असा ठेवलेला असतो. अलीकडे राकेल तेलाचा फार उपयोग करूं लागले आहेत. घरामध्यें देव ठेवण्याकरितां एक पृथक् देवधर असतें. त्यांतील देव्हाऱ्यांत पुष्कळच जिन्नस असून त्यांतच लहान लहान टांक असतात. त्या टाकांवर देवादिकांची व वाड- वडिलांचीं नांवें खोदलेली असतात. त्यांपुढे बसून घरचा धनी दररोज आपली प्रार्थना ह्मणतो.

 ज्याला ह्मणून साधेल तो प्रत्येक जपानी आपल्या घरांजवळ बाग केल्यावांचून राहावयाचा नाहीं. त्या बागेतील कुंड्यांत फुलझाडें थोडी असतील तर त्याला त्या गोष्टीचा इतका विषाद वाटावयाचा नाहीं; परंतु प्रत्येक वार्गेत एक मत्स्य तलाव, लहानच पण सुंदरसा पूल, खडकाच्या आकाराची केलेली दगडांची रास, व खुरटे केलेले वृक्ष, ही इतकी व्यवस्था असल्यावांचून त्याला चैन पडावयाचें नाहीं. आपल्या स्वाभा- विक जोराने उंच वाढलेले वृक्ष ज्याप्रमाणे दिसतात; त्या- प्रमाण थेट लहान झुडपें दिसतीलशी करणे ही कला त्या लोकांना फार चांगली साधली आहे.

 युरोपियन लोकांना जपानी लोकांची घरें सोईचीं वाटत नाहींत. एक तर त्यांत पाहिजे तसें एकांस्थान मिळत नाहीं. दारे उघडी ठेविली तर वारा व पाऊस आंत येतो. झांकली