पान:जपानचा इतिहास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
जपानचा इतिहास.

 जेवणाचे वेळी प्रत्येकाजवळ निरनिराळें लाखी एकेक ताट असतें. जपानी लोकांच्या निजावयाच्या अशा निराळ्या खोल्या नसतात. जेथें सोईचें पडेल तेथेच गाद्या टाकून निज- तात. ते लांकडी उशीचा उपयोग करितात, ह्मणून मागे सांगितलेच आहे. त्या उशीवर जेथें मान टेकावयाची त्या ठिकाणी कागदाच्या किंवा कापसाच्या योगानें जागा मऊ केलेली असते. डांसाचा उपद्रव होऊ लागला तर पडद्यांचा उपयोग करितात.

 जपानी घरांमध्ये अगदीं नडीचेच असे हाटले तर दोन पदार्थ. एक 'अग्निकुंड' व दुसरें 'तमाखुपात्र' हीं दोन्हीं पा नसतील तर जपानी मनुष्याचें हरघडीला अडेल. अग्निकुंड हैं. पितळेचें एक वाटोळ्या आकाराचें पात्र असून त्यांतलाक- डाची राख व पेटलेले निखारे ठेवलेले असतात. कोठें कोठें तें पात्र लांकडी असून तें आंतल्या बाजूनें, अग्निसंपर्क जिच्या- वर बिलकूल चालत नाहीं, अशा प्रकारच्या मातीनें तें सार- चून घेतलेलें असतें. त्या कुंडाचा दोन तहांनीं उपयोग होतो. एक, चिलीम वरचेवर पेटविण्याकडे व दुसरा ऊब राखण्याकडे. तमाखुपात्र हें असल्याच प्रकारचें भांडें असतें, परंतु तें अग्निकुंडापेक्षा लहान असतें.

 थंडीचा फारच कडाका पडेल तर त्यावेळी थंडीचे निवारण करण्याकरितां निराळीच योजना केलेली असते. बसावयाच्या खोलींत एके ठिकाणीं एक चौरस खड्डा खणलेला असून तो अग्नीला अदाा अशा मातीनें सारविलेला अततो. त्यांत राख व पेटलेले कोळसे आणून टाकतात.थंडीचा कडाका असा झाला हणजे घरांतील माणसें दुल्या पांघरून ह्या