पान:जपानचा इतिहास.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वै.

४३


ह्मणतील की, अमूक खोली अमूक एक चटया औरस चौरस आहे. स्वयंपाकगृहांत व ह्या खोलीतून त्या खोलीत जाण्याच्या मार्गात चटया हातरलेल्या नसतात. स्वयंपाकगृहाची जमीन लाकडी तक्तपोशीची केलेली असून ती नेहमी फार स्वच्छ असते.

 एखाद्या घराला दुसरा मजला असला, तर तो घराच्या मागच्या बाजूला असावयाचा, तो असा कीं पुढच्या अंगाला थोडेसें छपर दिसून नंतर दुसऱ्या मजल्याच्या खिडक्या दिसावयाच्या जपानी घरांत ज्या उत्कृष्ट खोल्या असावयाच्या त्या घराच्या मागच्या बाजूला असावयाच्या. त्याच बाजूला नागही असते.

 रात्रींच्या प्रसंगी ' पर्जन्यद्वारें ? अशी ज्याला संज्ञा आहे, त्या सर्व फळ्या लावून टाकलेल्या असतात. त्यावेळी घरांत जर कोणाला बाहेरून यावयाचें झालें, तर त्या फळ्यांपैकी ज्या फळीला कडीकोयंडा बसविलेला असतो, त्या फळी- "जवळ तो येतो व जरा सभ्यपणानें हाक मारावयाची असेल तर 'मी तुमची माफी मागतों' असे शब्द उचारतो व वसरटीने हाक मारावयाची 'अहो, अहो, मी ह्मणतो, ' असें ओरडून टाळ्या पिटतो, ह्मणजे मग त्याला दार उघडतात.

 जपानी लोक खुर्च्या टेबलांचा फारसा उपयोग करीत नाहींत. ते नेहमी बहुतेक खाली जमीनीवरच बसतात. आपण याप्रमाणे आसनमांडी घालून बसतों, त्याप्रमाणें न बसतां ते नेहमी खुरमांड्या घालून बसतात. आपल्या चटयांना 'मळ लागून त्या घाण होऊं नये, हाणून बहुश: आपले जोडे ते दारांतच ठेवितात.